आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षांनुसार पुस्तके; दप्तर हलके होणार; अप्रशिक्षित शिक्षकांना प्रशिक्षण देणार- जावडेकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शाळकरी मुलांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केंद्र सरकार नवी योजना आणत आहे. याअंतर्गत परीक्षांनुसार पुस्तके तयार केली जातील. म्हणजे तिमाही, सहामाही व वार्षिक असा पॅटर्न असेल. यामुळे पुस्तकांचा आकार लहान होऊन वेगवेगळ्या विषयांचे धडे त्यात जोडले जातील. यामुळे केवळ पुस्तकांचे वजन घटणार नाही  तर विद्यार्थ्यास ज्या विषयाचा अभ्यास करावयाचा आहे तीच पुस्तके शाळेत घेऊन जाऊ शकतील. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिव्य मराठी नेटवर्कला ही माहिती दिली.
 
जावडेकर म्हणाले, देशांतील शाळांमध्ये ११.०९ लाख अप्रशिक्षित शिक्षक आहेत. अप्रशिक्षित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना का शिकवावे? त्यांची नियुक्ती सर्वशिक्षा अभियान व शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत झाली आहे. या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी सरकारने दोन वर्षांचे उद्दिष्ट ठेवले आहे. याअंतर्गत अप्रशिक्षित शिक्षकांना मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या स्वयं पोर्टलवर १५ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करावी लागेल.त्यासाठी सरकारने डीएलएड(डिप्लोमा इन एलिमेंट्री एज्युकेशन) कार्यक्रम सुरू केला आहे. यामध्ये शिक्षकांना  १ ऑक्टोबरपासून स्वयंप्रभा वाहिनीद्वारे ऑनलाइन धडे दिले जातील. हा वर्ग जूनपर्यंत चालेल.
 
अप्रशिक्षित शिक्षकांना १०८० तास अभ्यास अनिवार्य : प्रशिक्षणाअंतर्गत अप्रशिक्षित शिक्षकांना १०८० तास अभ्यास करणे अनिवार्य आहे. हे प्रशिक्षण ऑनलाइन व ऑफलाइन उपलब्ध असेल. शिक्षकांसाठी एक अॅप तयार करण्यात आले आहे. यामध्ये शिक्षक डीएलएड कोर्सशी संबंधित प्रश्न विचारू शकतील. तज्ज्ञांमार्फत त्यास उत्तर दिले जाईल. \\नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग(एनआयओएस) डीएलएड कोर्स संचालित करेल. मुक्त विद्यालय असल्यामुळे बहिस्थ शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण व प्रमाणपत्र दिले जाईल.

कोर्स पॅटर्न व टीव्ही वाहिनीच्या कार्यक्रम निर्मितीत एनसीटीई, इग्नू व एनसीईआरटी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. दरवर्षी हा कोर्स पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना १२ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाईल.

असे मिळेल प्रशिक्षण
मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, दूरदर्शनकडून १५०० रुपयांत डिश व सेटटॉप बॉक्स मिळेल. यानंतर कोणत्याही प्रकारचे पैसे भरण्याची गरज नाही. घरी नि:शुल्क डिश बसवली जाईल. यावर दिवसभरात तीन वेळा स्वयंप्रभा वाहिनीवर डीएलएड कोर्सशिवाय १०३ शैक्षणिक वाहिन्या मोफत उपलब्ध होतील.
 
बातम्या आणखी आहेत...