आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Books Paint Vivid Portrait Of Param Vir Chakra Winners, News In Marathi

परमवीर चक्र विजेत्यांची कॉमिक्स शौर्यगाथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांची शौर्यगाथा सांगणारी ग्रंथमाला आणि कॉमिक्स पुस्तके नुकतीच वाचकांच्या भेटीला आली आहेत. त्यात परमवीर चक्राने गौरव झालेल्या जवानांनी प्राणाची आहुती देऊन देशाचे रक्षण केल्याचा धगधगता सचित्र इतिहास मांडण्यात आला आहे.

परमवीर चक्र प्राप्त जवानांचा इतिहास सांगणाऱ्या कॉमिक्सचे भाग तीन आणि चार रॉली बुक्सकडून प्रकाशित झाले आहेत. निवृत्त मेजर जनरल इयान कार्डोझो यांनी हे कॉमिक्ससाठी लेखन केले आहे. त्यात हवाई दलातील निर्मलजित सिंग सेखॉन आणि मेजर शैतन सिंग यांची व्यक्तिचित्रे चितारण्यात आली आहेत. ऋषी कुमार यांनी व्यंगचित्रे काढली आहेत.

देशभक्तीच्या कथा : ‘द ब्रेव्ह: परमवीर चक्र स्टोरीज’ नावाचे पुस्तकही नुकतेच उपलब्ध झाले आहे. त्यात २१ बलिदानाच्या सर्वोच्च कथा सांगण्यात आल्या आहेत. रचना निश्त रावत यांनी देशभक्तीच्या कथांचे लेखन केले आहे. पेंग्विन प्रकाशनने त्या प्रकाशित केल्या आहेत. भारतीय शौर्य आणि हृदयातील धैर्य यांचा वेध यातून घेण्यात आला आहे. पहिल्या सहा प्रकरणांत सोमनाथ शर्मा, करम सिंग, रामा रघोबा राणे, जदुनाथ सिंग, पिरू सिंग शेखावत यांच्या शौर्यकथा आहेत.