आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#NetajiFiles झाल्या सार्वजनिक, रशियाच्या नजरेत MI-6 चे एजंट होते बोस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातील गोपनिय फाइल्स शनिवारी सार्वजनिक करण्यात आल्या. सुभाषबाबुंच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या सार्वजनिक केल्या. गृहमंत्रालयाची टॉप सिक्रेट असलेली 1976 ची 'नेताजी सुभाषचंद्र बोसछ प्रपोजल ऑफ अॅम्बेसी' देखिल उघड करण्यात आली आहे. यात आयबीशी संबंधित नोटिंग्स आहेत. यातील 205 पानांमध्ये सांगण्यात आले आहे, की नेताजींना रशिया ब्रिटनची गुप्तचर संस्था एमआय-6 ची एजंट मानत होती. पहिल्यांदा 100 फाइल्स सार्वजनिक करण्यात आल्या. यानंतर आता दर महिन्याला 25 फाइल जनतेसाठी खुल्या केल्या जातील. यावेळी पंतप्रधानांनी नेताजींवरील http://netajipapers.gov.in पोर्टलचे अनावरण केले.

ममता बॅनर्जी आणि काँग्रेस नेते काय म्हणाले
- ममता बॅनर्जी म्हणाल्या, सुभाषचंद्र बोस यांना लीडर ऑफ द नेशनचा दर्जा दिला पाहिजे.
- काँग्रेस नेते आनंद शर्मा म्हणाले, ज्या पद्धतीने मोदींनी हे केले (फाइल्स सार्वजनिक) त्यावरुन सरकारच्या भूमिकेवर शंका उपस्थित होतात. देशाला हे समजले पाहिजे.
- सरकार जाणिवपूर्वक वाद निर्माण करत आहे.
- नेहरुंचे जे पत्र ब्रिटनचे पंतप्रधान अॅटलींना लिहिल्याचे सांगितले जात आहे, काँग्रेस त्या पत्राला मानत नाही, ते खोटे असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. या पत्राचा भांडाफोड करु आणि जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल.
- काँग्रेसने दावा केला आहे, की आम्ही असे करणाऱ्यांचा शोध घेऊ आणि त्यांना उघडे पाडू.
फाइल विडो अँड डॉटर ऑफ श्री सुभाषचंद्र बोस
या फाइलमध्ये 21 पानांमध्ये 1956 ते 1971 दरम्यानची माहिती आहे.
या फाइलमधील माहितीनुसार, काँग्रेस 1964 पर्यंत नेताजींच्या पत्नीला दरमहा 6000 रुपये पेन्शन देत होती. मात्र 1965 मध्ये त्यांची मुलगी अनिताचे लग्न झाल्यानंतर ही मदत थांबवण्यात आली. नेताजींच्या पत्नीने ही मदत नको असल्याचे म्हटले होते, त्यानंतर पैसे पाठवणे बंद करण्यात आले. 7 जुलै 1965 ला व्हिएन्नाच्या परराष्ट्र मंत्रालयाला एक सिक्रेट टेलिग्राम करुन अनिता बोसच्या लग्नाबद्दल सांगण्यात आले होते.

- इंदिरा गांधींनी पाठवले होते दोन पाकिट
1966 मधील एक ऑफिशियल कम्युनिकेशन सांगते, की इंदिरा गांधींनी दोन पाकिटे पाठवली होती. नेताजींच्या मुलीला वॉश्गिंटनमधील भारतीय दुतावासाने ही पाकिटे पोहोचवली होती.

- इंदिरा गांधींना होती अनिता यांना भेटण्याची इच्छा
इंदिरा गांधींनी 26 फेब्रुवारी 1966 ला लिहिलेल्या पत्रातून कळते, त्यांना अनिता यांना भेटण्याची इच्छा होती. त्यात लिहिले आहे, 'मला अनिताला पुन्हा भेटण्याची इच्छा आहे. मात्र माझ्या अमेरिका दौऱ्याचा शेड्यूल असा आहे, की मला नाही वाटत भेट होईल.'
पंतप्रधान कार्यालयाकडे 41 फाइल्स आहेत. त्यातील 33 आज सार्वजनिक करण्यात आल्या.

नेहरुंच्या एका पत्रात सुभाषबाबुंना म्हटले वॉर क्रिमिनल
- या दस्ताऐवजांमधील एका पत्र पंडित जवाहरलाल नेहरुंनी इंग्लंडचे तत्कालिन पंतप्रधान क्लिमेंट अॅटली यांना लिहिले होते. त्यात नेहरुंनी बोस यांना वॉर क्रिमिनल म्हटले होते.
- हे पत्र 27 डिसेंबर 1945 ला लिहिले होते. या पत्राच्या खाली नेहरुंचे फक्त नाव लिहिलेले होते. त्यांची स्वाक्षरी नाही.
नेहरुंनी म्हटले होते बोस यांच्यावर कारवाई करा
- नेहरुंनी अॅटलींना लिहिले होते, मला माझ्या खात्रीलायक सूत्रांकडून कळाले आहे, की सुभाषचंद्र बोस जे तुमचे वॉर क्रिमिनल आहे. त्यांना स्लॅलिनने रशियाच्या सीमेत प्रवेश करण्याची मंजूरी दिली आहे.
- रशियाना हा धोका दिला आहे, कारण रशिया ब्रिटीश-अमेरिकन आघाडीचा समर्थक आहे. रशियाने असे करायला नको होते. आता तुम्ही त्यावर लक्ष द्या आणि योग्य ती कारवाई करा.

भास्करच्या चौकशीत काय समोर आले...
दैनिक भास्करने या पत्राबाबत जेव्हा चौकशी केली तेव्हा कळाले की हे पत्र बोस यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या खोसला समिती समोरही आले होते, कारण ते आधीच उघड झालेले होते.
भास्करने जेव्हा याबाबत पीएमओकडे विचारणा केली तेव्हा सूत्रांनी सांगितले की हे खरे आहे. मात्र आतापर्यंत याला दुजोरा मिळालेला नव्हता, आता ते अधिकृत दस्ताऐवजांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
- सर्वात आधी गृहमंत्र्यांनी त्याची अधिकृतता तपासली त्यानंतर पंतप्रधानांनी त्यावर स्वाक्षरी केली.
- याचा अर्थ आता हे कागदपत्र सरकारी दस्ताऐवज म्हणून गणले जातात.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नेताजींसंदर्भातील दस्ताऐवज