आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Boy Killed By Tiger At National Zoological Park Delhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTO: 6 वर्षांपूर्वी त्याच प्राणी संग्रहालयात वाघिणीने जिवंत सोडले होते तरूणाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील प्राणी संग्रहालयात एका तरुणाला पांढर्‍या वाघाने ठार केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे याच प्राणी संग्रहालयात सहा वर्षांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. मात्र त्यावेळी वाघिणीसमोर पडलेल्या युवकाला वाघिणीने काहीच केले नव्हते.
"देव तारी त्याला कोण मारी" असे म्हणतात आणि याची प्रचिती कधी कधी येतेही. मंगळवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर दिल्लीतील तसेच देशातील प्राणी संग्रहालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थिती झाले आहेत. राष्ट्रीय प्राणी संग्रहालयाच्या एका अधिकार्‍याने या विषयी माहिती देताना एक धक्कादायक माहिती दिली आहे. ते म्हणाले की, "सहा वर्षापूर्वी याच प्राणीसंग्रहालयात अशीच एक घटना घडली होती. एक नशेत असलेला तरूण नेमका वाघिणीच्या समोर पडला. मात्र त्या तरूणाचे नशिब चांगले असावे म्हणून वाघिणीने त्याला काहीच केले नाही. ती वाघिण तरूणाला बराच वेळ पाहात होती, मात्र तिने त्याच्यावर कसलाच हल्ला केला नाही. त्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलली आणि कर्मचार्‍यांनी वाघिणीला पिंजर्‍यात पाठवले."

डोळ्यासमोर मृत्यू उभा असलेला पाहून त्या मुलाची नशा क्षणात उतरली. धावत पळत तो तरूण एका झाडावर चढला. अनेक विनवण्या करून त्या युवकाला खाली उतरवण्यात आले, असेही अधिकार्‍यानी सांगितले.
पुढील स्लाईडवर पाहा, दिल्लीत मंगळवारी झालेल्या पांढर्‍या वाघाच्या हल्ल्याची छायाचित्रे...