आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुखोईतून प्रथमच करण्यात आला 2.5 टन वजनी ब्रह्मोसचा मारा, योग्य ठिकाणी लागला निशाणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एअरफोर्सने प्रथमच सुपरसॉनिक क्रूज ब्रह्मोस मिसाइलची टेस्ट केली आहे. बुधवारी बंगालच्या खाडीमध्ये सुखोईद्वारे याचा मारा करण्यात आला. न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार ब्रह्मोसने यशस्वीरित्या लक्ष्यावर मारा केला. यापूर्वी ब्रह्मोसची टेस्ट जमीनीवरून आणि वॉरशिपद्वारे करण्यात आली आहे. ब्रह्मोस जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूज मिसाइल आहे. त्याचा वेग 2.8-3.0 मॅक (3675-3430 Kmph)आहे. अगदी योग्य निशाण्यावर लागत असल्याने याला 'मारा करा आणि विसरुन जा' क्षेपणास्त्रही म्हटले जाते. 


असे आहे ब्रह्मोस
नद्यांपासून मिळाले नाव 
- ब्रह्मपुत्र (भारत), मसक्वा (रशिया) च्या नावावरून ब्रह्मोस नाव मिळाले 
- रेंज- 290 KM
- वजन- 3000 Kg, लांबी- 8 M, रुंदी - 0.6 M
- 300 Kg पर्यंतचे वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता.. 


मारा करा आणि विसरुन जा.. 
- योग्य निशाण्यामुळे याला, 'मारा करा आणि विसरुन जा' असेही म्हणतात. 
- सबमरीन, शिप, एअरक्राफ्ट, जमिनीवरून लाँचिंग शक्य. 
- भारत-रशियाच्या जॉइंट व्हेंचर ब्रह्मोस एअरस्पेसद्वारे निर्मिती. 
- हैदराबाद, तिरुवनंतपुरममध्ये ब्रह्मोस एअरस्पेस सेंटर आहे. 


वेगात अव्वल 
- जगातील सर्वात वेगवान अँटी-शिप क्रूज मिसाइल आहे. 
- स्पीड- 2.8-3.0 मॅक (3675-3430 Kph)
- संपूर्ण फ्लाइटमध्ये सुपरसॉनिक स्पीड कायम राहते. 
- स्टील्थ टेक्नॉलॉजी, गाइडन्स सिस्टीम, अॅडव्हान्स टेक्नोलॉजी

 

 

बातम्या आणखी आहेत...