आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Breach In PM's Security As Speeding SHO 'hits Officer's Car And Runs Off'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसएचओने पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था तोडली, अधिका-यांना अरेरावी आणि धमकीही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली पोलिसच्या एका एसएचओने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षा व्यवस्था तोडत सुरक्षा अधिका-यांसोबत वाद घातला. हौज खास पोलिस स्टेशनचे एसएचओ निरज कुमार यांच्यावर आरोप आहे, की त्यांनी केवळ पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्थाच भेदली नाही तर ड्यूटीवर असलेल्या अधिका-यांशी वाद घातला आणि त्यांच्या दोन गाड्यांना टक्कर मारली. या प्रकरणी निरजकुमार यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ही घटना बुधवारी रात्री 8.10 वाजता लुटियन्स झोनच्या रेस कोर्स रोडवर घडली.
पंतप्रधानांचा ताफा जाणार असल्याने बुधवारी रात्री आठ वाजता लुटियन्स झोनच्या रेसकोर्स रोड आणि सफदरजंग रोड चौकात वाहतूक थांबवण्यात आली होती. तेव्हाच सफदरजंग रोडवरुन एक कार वेगात येताना दिसली. एसीपी (पीएम सुरक्षा) विमलकुमार यांनी ती कार थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र, सरकारी वाहनाला टक्कर मारून ती कार पुढे गेली. विमलकुमार यांनी तत्काळ वायरलेसवरुन कार थांबवण्याचा संदेश पाठवला. त्यानंतर काही वेळाने सफदरजंग रोड येथे तैनात पीसीआर व्हॅनने कारचा पाठलाग सुरु केला तेव्हा व्हॅनलाही टक्कर मारून कार पुढे निघाली. सफदरजंग रोड येथे वाहतूक सिग्नल येथे कार थांबल्यानंतर वाहतुक पोलिसाने कार अडवली. तेव्हा गाडीतून एसएचओ बाहेर आले आणि त्यांनी वाहतूक पोलिस कर्मचा-याशीही वाद घातला. तेवढ्यात कारचा पाठलाग करत एसीपी विमलकुमार घटनास्थळी दाखल झाले आणि वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसएचओने त्यांनाही अरेरावीची भाषा वापरत धमकी दिली.
शेवटी एसएचओ घटनास्थळाहून फरार झाले आणि हौज हाऊस पोलिस स्टेशनला गेले. तिथे त्यांनी स्टेशन डायरीमध्ये त्यांची नोंद केली. गुरुवारी हे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिका-यांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी एसएचओला हजर होण्याचे आदेश दिले. वरिष्ठ अधिका-यांनी एसएचओच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.