आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन: ट्यूब ट्रेनमध्ये IED स्फोटकांचा वापर, 22 जण गंभीर जखमी; ट्रम्प यांनी केले हे ट्विट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांच्या माहितीनुसार सकाळी 8.21 वाजता स्फोट झाला. - Divya Marathi
पोलिसांच्या माहितीनुसार सकाळी 8.21 वाजता स्फोट झाला.
लंडन- ब्रिटनची राजधानी लंडनच्या पार्सन्स ग्रीन स्थानकावर भुयारी मेट्रोच्या एका डब्यात शुक्रवारी झालेल्या बादली बॉम्बच्या स्फोटात एका मुलासह २२ प्रवासी जखमी झाले. यामध्ये अनेक जण भाजले. स्फोट सकाळी ८.२० वाजता झाला. या वेळी मेट्रोत बरीच गर्दी असते. स्कॉटयार्ड पोलिस व दहशतवादविरोधी पोलिसांनी त्यास दहशतवादी हल्ला ठरवला आहे. स्फोटात आयआयडीचा वापर टायमर लावून केला होता.  मात्र, टायमर असूनही स्फोटके अधिक क्षमतेने फुटली नाहीत. त्यामुळे मोठी हानी टळली. स्फोटानंतर डब्याबाहेर पडलेल्या प्रवाशांत एकच गोंधळ उडाला, यात अनेक जण जखमी झाले. स्फोटानंतर हल्लेखोर चाकूने हल्ला करू शकतो, असा पोलिसांना संशय होता. त्यामुळे परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आला. ब्रिटनमध्ये गेल्या ९ महिन्यांत झालेला हा पाचवा दहशतवादी हल्ला आहे. यानंतर दिल्ली मेट्रोतही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
 
अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर ब्रिटन
- ७ जुलै २००५ : लंडनच्या वाहतूक यंत्रणेला लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यात ५२ जण ठार. चार ठिकाणी एकाच वेळी स्फोट.
- २००५ ते २०१३ दरम्यान स्कॉटयार्ड पोलिसांनी अतिरकेी हल्ल्याचे १९ कट निष्फळ केले होते.
-  या वर्षी जून २०१७ पर्यंत ब्रिटनमध्ये ३७९ जणांना अटक.
-  २००१ पासून दहशतवादी घटनांची माहिती स्वतंत्र ठेवली जाते.
-  ब्रिटनची गुप्तचर संस्था  ५०० अतिरेकी दहशतवादी घटनांचा तपास करत आहे. त्यात ३००० संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
 
- स्फोटक बकेटमध्ये ठेवली
हल्लेखोरांनी स्फोटके एका बकेटमध्ये ठेवली होती. बकेट एका मॉलच्या बॅगमध्ये ठेवून त्यावर ख्रिसमस लाइट लावण्यात आला होता. त्यामुळे कुणालाही शंका आली नाही.
 
पॅरिसमध्ये सैनिकावर हल्ला
फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस शहरात दहशतवादविरोधी पथकात तैनात सैनिकावर एकाने अल्लाहचे नाव घेत चाकू हल्ला केला. त्याला इतर सैनिकांनी तत्काळ अटक केली.
 
दिल्ली मेट्रोत हायअलर्ट
लंडनमधील स्फोटानंतर दिल्ली मेट्रोत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सीआयएसएफने धडक कृती दलाची अतिरिक्त(क्यूआरटी) २५ पथके तैनात केली आहेत. क्यूआरटीच्या एकूण ७० युनिट्सना मेट्रो स्टेशनवर गस्त घालण्याचे निर्देश दिले आहेत.
 
केव्हा आणि कुठे झाला स्फोट 
ब्रिटीश मीडियानुसार स्फोट सकाळी 8.21 वाजता झाला. स्फोट झाला तेव्हा ट्यूब ट्रेन पार्सन्स ग्रीन स्टेशनवर आली होती. स्फोटकं एका पांढऱ्या रंगाच्या डस्टबिनमध्ये ठेवण्यात आले होते. तिथे काही वायर आणि ऑइली केमिकल सांडलेले दिसले. 
 
हा हल्ला दहशतवादी 
हा दहशतवादी हल्ला होता की नाही, याबाबत ब्रिटीश प्रशासनाने अद्याप काहीही सांगितलेले नाही. मेट्रोपॉलिटन पोलिसांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे, प्राथमिक तपासावरुन आम्ही असे म्हणू शकतो की हा दहशतवादी हल्ला होता. तपास सुरु आहे.
 
- ब्रिटीश दैनिक 'द टेलिग्राफ'च्या वृत्तानुसार, घटनेवेळी स्टेशनवर मोठी गर्दी होती.   पार्सन्स ग्रीन स्टेशनवर बहुतेक लोक हे ऑफिसला जाण्यासाठी निघाले होते. येथील लोक अंडरग्राऊंड ट्रेनला ट्यूब ट्रेन म्हणतात. स्फोटानंतर स्टेशनवर गदारोळ माजला आणि लोक सैरावैरा धावत सुटले, यामुळे ही अनेक नागरिक जखमी झाले. 
- प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहे. पोलिसांनी लंडनमधील अनेक ठिकाणी चेक पाँइंट तयार केले आहे. 
- लंडन ट्रान्सपोर्टने म्हटले आहे, की आम्ही विम्बल्डन आणि अर्ल कोर्टसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना दुसरा मार्गावरुन जाण्याचे आवाहन केले आहे. 
- या घटनेनंतर या मार्गावरील सर्व ट्यूब ट्रेन रद्द करण्यात आल्या असून काही ट्रेन वळवण्यात आल्या आहे.
 
दुसरा एक बॉम्ब डिफ्यूज 
- लंडन अॅम्ब्यूलन्स सर्व्हिसने म्हटले, की पार्सन्स ग्रीन स्टेशनवर झालेल्या स्फोटानंतर आमची टीम तत्काळ तिथे पोहोचली. जखमींना तातडीने मदत पोहोचवणे आमचे काम आहे. 
- लंडनमधील दैनिक 'द सन'च्या वृत्तानुसार, बकेट ब्लास्टमध्ये 20 लोक जखमी झाले. पोलिस एका चाकूवाल्या व्यक्तीचा शोध घेत आहे. 
- रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की पार्सन्स ग्रीन स्टेशनवर आणखी एक डिव्हाइस बॉम्ब स्कॉडने डिफ्यूज केले आहे. 

दोन प्रत्यक्षदर्शी आले समोर 
 - स्फोटानंतर दोन प्रत्यक्षदर्शी समोर आले आहे. लंडनचा नागरिक असलेल्या या व्यक्तीने दोन फोटोही ट्विटरवर शेअर केले. त्यासोबत म्हटले आहे, की मी घटनास्थळी उपस्थित होतो. डब्यामध्ये स्फोट झाल्यानंतर तिथे वायर आणि केमिकल स्पष्ट दिसत होते. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनास्थळावरील फोटो...
बातम्या आणखी आहेत...