आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजमेर बॉम्बस्फोट बाॅम्बस्फाेटप्रकरणी स्वामी असीमानंद निर्दोष मुक्तता, तिघे दोषी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - २००७ च्या अजमेर बॉम्बस्फोट खटल्यात उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते स्वामी असीमानंदसह ६ जणांची विशेष न्यायालयाने बुधवारी निर्दोष मुक्तता केली, तर बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायद्यासह भादंवि व स्फोटक पदार्थ अधिनियमांंच्या विविध कलमांन्वये सुनील जोशी, भावेश पटेल व देवेंद्र गुप्ता या तिघांना दोषी ठरवले.

‘संशयाचा फायदा’ घेत न्यायमूर्ती दिनेश गुप्ता यांनी  स्वामी असीमानंदासह सहा जणांना दोषमुक्त केले.  अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यात रमजान महिन्यात इफ्तारच्यावेळी ११ ऑक्टोबर २००७ रोजी बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. या स्फोटात तीन भाविक ठार तर १५ जण जखमी झाले होते.  स्वामी असीमानंद १८ फेब्रुवारी २००७ च्या समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटाचाही आरोपी आहे. रेल्वेच्या दोन डब्यात घडवलेल्या स्फोटात ६८ जण ठार झाले होते. अभिनव भारतचा सदस्य असीमानंद डिसेंबर २०१० पासून तुरुंगात आहे.  दोषींना १६ मार्च रोजी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
 
- असीमानंदवर राजस्थानमधील अजमेर येथील प्रसिद्ध ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्गा येथे 2007 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा कट रचण्याचा आरोप होता.  
-  राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)  विशेष न्यायालयाने असीमानंदची निर्दोष मुक्तता केली आहे. असीमानंदविरोधात पुरावे मिळाले नसल्याचे एनआयएच्या जयपूर न्यायालयाने म्हटले आहे. त्याचेवळी या प्रकरणी तिघांना दोषी करार दिला आहे. 
- दोषींना 16 मार्चला शिक्षा सुनावली जाणार आहे. सुनील जोशीसुद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होता. 
- 11 ऑक्टोबर 2007 रोजी सायंकाळी 6.15 वाजता इफ्तार सोडण्याच्या वेळी दर्ग्यात स्फोट झाले होता. स्फोटात 3 जण ठार तर 20 पेक्षा जास्त जखमी झाले होते.
- घटनास्थळी सापडलेल्य बॅगमध्ये जिवंत बॉम्ब होता. तो निकामी करण्यात आला होता. 
- पोलिसांना दोन सीमकार्डही जप्त केले होते. त्यातील एक झारखंड तर दुसरे पश्चिम बंगालमधून खरेदी करण्यात आले होते. दोन्ही सीमकार्डचा बॉम्बस्फोटात वापर करण्यात आला होता. 
- राजस्थान एटीएसने 20 ऑक्टोबर 2010 मध्ये अजमेरमध्ये तीन जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. एक एप्रिल 2011 रोजी बॉम्बस्फोटाचा तपास एनआयएकडे देण्यात आला होता.  - एनआयएने 13 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यातील 8 आरोपी 2010 पासून तुरुंगात आहे. एक आरोपी चंद्रशेखर लेवे जामीनावर बाहेर आहे. 
- दोषी ठरविण्यात आलेल्या सुनील जोशीचा खून झाला आहे. संदीप डांगे, रामजी कलसांगरा आणि सुरेश नायर अद्याप फरार आहे. 
- एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार सुनील जोशी, देवेंद्र आणि भावेशसह आणखी सहा जणांवर हत्या, षडयंत्र रचणे आणि बॉम्ब प्लान्ट करण्याचा आरोप आहे. 
- एनआयएच्या आरोपपत्रात असीमानंद या हल्ल्याचा मास्टर माइंड असल्याचे म्हटले होते.
- रमजानच्या महिन्यात धार्मिक तणाव निर्माण करण्याच्या उद्देशाने, त्यासोबतच 2002 मध्ये अमरनाथ यात्रा आणि जम्मूमधील रघुनात मंदिरावरील हल्ल्याचा सूड उगवण्यासाठी हा स्फोट घडविण्यात आल्याचे तपास निष्पन्न झाले होते. 
-  अजमेर बॉम्बस्फोटात संघाचे प्रचारक असीमानंद यांचे नाव आल्यानंतर गदारोळ माजला होता. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या प्रकरणाबद्ल 'हिंदू दहशतवाद' असे म्हटले होते. त्याला हिंदूत्ववादी संघटनांनी मोठा आक्षेप घेतला होता. 

कबुली जबाब फिरवला होता
- स्वामी असीमानंदला अजमेर, हैदराबाद आमि समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरणी 19 नोव्हेंबर 2010 ला उत्तराखंडमधील हरिद्वार येथून अटक केली होती. 
- 2011 मध्ये त्यांनी न्यायाधिशांसमोर दिलेल्या जबाबाद अजमेर, हैदराबाद आणि मक्का मशिद व इतर ठिकाणी झालेल्या स्फोटांमध्ये त्यांच्यासह हिंदू कट्टरवाद्यांचा हात असल्याचे म्हटले होते.
 - मात्र नंतर त्यांनी पलटी मारली आणि एनआयएच्या दबावात हा जबाब दिल्याचे म्हटले होते. 
 - असीमानंद हे मालेगाव बॉम्बस्फोटात नाव आलेल्या साध्वी प्रज्ञासिंहचे निकटवर्तीय मानले जात होते.
 - प्रज्ञावर सुनील जोशीच्या हत्येचा आरोप होता. या प्रकरणात 1 फेब्रुवारी रोजी साध्वी प्रज्ञाची निर्दोष मुक्तता झाली आहे.
 
समझौता एक्स्प्रेस ब्लास्टमध्येही नाव
भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान धावणारी एकमेुव रेल्वे समझौता एक्स्प्रेसमध्ये स्फोट घडवून आणण्याचाही असीमानंदवर आरोप होता. समझौता एक्स्प्रेसमध्ये 18 फेब्रुवारी 2007 मध्ये चार आयआयडी स्फोट घडवून आणण्यात आले होते. त्यात 68 लोक मारले गेले होते. 
स्वामी असीमानंदचे खरे नाव नव कुमार सरकार आहे.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...