आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे लष्कराच्या कँपवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
11 जुलै रोजी अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात 8 यात्रेकरु मृत्यूमुखी पडले होते. - Divya Marathi
11 जुलै रोजी अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात 8 यात्रेकरु मृत्यूमुखी पडले होते.
श्रीनगर - काश्मीरच्या कुपवाडा येथील कलारुप वनक्षेत्रातील आर्मी हेडक्वार्टरवर शुक्रवारी रात्री हल्ला झाला आहे. त्यात एक जवान शहीद झाला असून लष्कराने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी पाकिस्तानने मेंढर सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंखन केले आहे. सीमेपलिकडून झालेल्या बेछूट गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. 
 
अशी माहिती आहे की दहशतवाद्यांनी ४१ राष्ट्रीय रायफल कँपला लक्ष्य केले. हा हल्ला दहशतवाद्यांच्या एका ग्रुपने केला होता. भारतीय सेना आणि सुरक्षा यंत्रणेने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. संपूर्ण परिसरात नाकेबंदी करण्यात आली असून त्यांचा शोध घेतला जात आहे. 
दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमध्ये पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून फायरिंग सुरु आहे. यात एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. शनिवारी सकाळी 5 वाजतापासून फायरिंग सुरु आहे. त्यानतंर प्रशासनाने या भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे. भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
 
एक महिन्यापूर्वी अमरनाथ यात्रेकरुंना केले लक्ष्य 
- 11 जुलै रोजी अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरुंना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. यात 8 जणांचा मृत्यू झाला होता तर 16 यात्रेकरु जखमी झाले होते. मृतांमध्ये 5 महिलांचा समावेश होता. यातील दोन महाराष्ट्रातील होत्या. यात्रेकरु जम्मूहून परत येत असताना हा हल्ला झाला होता. 
बातम्या आणखी आहेत...