आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विजय माल्ल्याला लंडनमध्ये दुसऱ्यांदा अटक, अटकेच्या अर्ध्या तासातच जामीनही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / लंडन- ईडीच्या मनी लाँडरिंग प्रकरणात फरार विजय मल्ल्याला मंगळवारी लंडनमध्ये दुसऱ्यांदा अटक झाली. मात्र काही मिनिटांतच वेस्टमिन्स्टर कोर्टाने ५२ लाखांच्या बाँडवर जामीन दिला. पुढील सुनावणी २० नोव्हेंबरला होईल. कोर्टात मल्ल्याच्या चेहऱ्यावर निर्ढावलेले भाव होते. पाच महिन्यांत ही मल्ल्याची दुसरी अटक होती. यापूर्वी १७ एप्रिलला प्रत्यार्पण वॉरंटवर त्याला अटक करण्यात आली होती. तेव्हाही काही वेळेतच तो जामीनावर सुटला होता. विविध बँकांचे सुमारे ९ हजार रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी मल्या भारतात वाँटेड आहे. गतवर्षी मार्चमध्ये तो लंडनला पळाला होता. यानंतर भारताने त्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनला विनंती केली होती. त्याची सुनावणी ४ डिसेंबरपासून सुरू होईल.
 
असे समजून घ्या पूर्ण प्रकरण 

केव्हा झाली पहिली अटक 
- माल्ल्या 2 मार्च 2016 ला भारतातून पसार होऊन लंडनमध्ये स्थायिक झाला. प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (PMLA) संबंधीच्या एका प्रकरणात मुंबईच्या विशेष कोर्टाने त्याला फरार घोषित केले होते. माल्ल्या पळून गेल्यानंतर त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला होता. यावर्षी फेब्रुवारीमध्ये भारताने माल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी लंडन सरकारला पत्र लिहिले होते. 
- यानंतर मार्चमध्ये ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांनी लंडनमध्ये भारतीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रोटोकॉल तोडून भेट घेतली होती. या भेटीत माल्ल्याला भारताला सोपवण्यासंदर्भात चर्चा झाली होती. 
- यूके गव्हर्नमेंटने पुढील कारवाईसाठी केस जिल्हा न्यायालयाकडे पाठवली. त्यानंतर माल्ल्याला एक्स्ट्राडिशन वॉरंटवर एप्रिलमध्ये अटक झाली होती. वॉरंट जारी झाल्यानंतर माल्ल्या स्वतः सेंट्रल लंडन पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला होता. 
 
विलफुल डिफॉल्टर विजय माल्ल्या
- भारतीय स्टेट बॅंकेने माल्ल्याला विलफुल डिफॉल्टर घोषित केले होते. यापूर्वी दोन बॅंकांनी देखील माल्ल्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकले होते.
- माल्ल्यासोबत त्याची होल्डिंग कंपनी यूनाइटेड ब्रेव्हरीज होल्डिंग्ज व किंगफिशर एअरलाइन्सला विलफुल डिफॉल्टर घोषित केले होते.
- किंगफिशर एअरलाइन्स ऑक्टोबर 2012 पासून बंद आहे. डिसेंबर 2014 मध्ये किंगफिशरचे फ्लाइंग परमिट रद्द झाले होते.
 
बँकांना माल्ल्याकडून किती वसूल करायचे ?
(सर्व आकडेवारी कोटींमध्ये )
>एसबीआय-1600
>पीएनबी-800
>आयडीबीआय-800
>बँक ऑफ इंडिया- 650
>यूनाइटेड बँक ऑफ इंडिया-430
>सेंट्रल बँक ऑफ इंडिया-410
>यूको बँक - 320
>कॉर्पोरेशन बँक -310
>स्टेट बँक ऑफ म्हैसूर-150
>इंडियन ओवरसीज बँक -140
>फेडरल बँक - 90
>पंजाब अॅण्ड सिंध बँक -60
> अॅक्सिस बँक -50
बातम्या आणखी आहेत...