आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tax On Bribed Member Of Parliaments Delhi High Court

लाचखोर खासदारांना लाचेवर लागणार कर, चारही खासदारांनी दिली होती कबुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- झारखंडमुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन तत्कालीन तीन खासदारांनी २१ वर्षांपूर्वी लाच घेऊन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे सरकार वाचवले होते. सुप्रीम कोर्टात ते लाच प्रकरणात निर्दोष ठरले; पण आता दिल्ली न्यायालयाने लाचेच्या रकमेवर कर द्यावा लागेल, असा निर्णय दिला आहे. म्हणजेच लाच म्हणून मिळालेल्या १.७६ कोटी रकमेवर या खासदारांना कर द्यावा लागेल.
दिल्ली हायकोर्टाने प्राप्तिकर विभागाच्या अपिलावर हा निर्णय देत प्राप्तिकर अपील लवादाचा निर्णय खारीज केला. खासदारांना मिळालेली रक्कम करपात्र नाही, असे लवादाने म्हटले होते. मात्र, सोरेन, सूरज मंडल, सायमन मरांडी शैलेन्द्र महतो यांना मिळालेली लाचेची रक्कम अघोषित उत्पन्न असल्याने करपात्र असल्याचे विभागाचे मत होते. न्या. संजीव खन्ना व्ही. कामेश्वर यांनी ते योग्य ठरवले.

या नेत्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार खटला चालला. तेव्हा विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मत देण्यासाठी काँग्रेसने पैसे दिल्याची कबुली त्यांनी दिली. कलम १०५ नुसार मतदानावरून खासदारािवरुद्ध कारवाई होऊ शकत नसल्याच्या तरतुदीमुळे ते सुटले होते.