आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिक्स बँकेचे एप्रिल २०१६ मध्ये कर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतासह इतर पाच ब्रिक्स देशांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या 'न्यू डेव्हलपमेंट बँक' (एनडीबी)च्या वतीने पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यापासून स्थानिक चलनानुसार कर्ज देण्यात येणार आहे. एनडीबीच्या या कर्ज सुविधेचा सर्व सदस्य देशांना फायदा होणार असल्याचे ब्रिक्स बँकेचे अध्यक्ष के. व्ही. कामत यांनी सांगितले. इतर देशांना सदस्य बनवण्यासंबंधीचा निर्णय बँक बोर्डाचे गव्हर्नर येत्या काही महिन्यांतच घेतील.

पुढील वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांतच कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. तोपर्यंत सर्व सदस्य देशांसाठी योजना तयार करण्याचे काम पूर्ण होण्याची आशाही कामतांनी व्यक्त केली. सदस्य देशांमध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन अाणि दक्षिण अाफ्रिकेचा समावेश आहे. त्यांच्या विकासासाठी मूलभूत गरजा पूर्ण करणे आवश्यक असल्याचे कामत यांनी सांगितले. एनडीबी बँकेची स्थापना १०० अब्ज डॉलरच्या अधिकृत निधीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ही बँक सदस्य देशांसाठी कर्जाच्या विविध योजना आखणार आहे.