नवी दिल्ली - जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणा-या ताज महलाचे सौंदर्य ही वास्तू दिवसेंदिवस पिवळी पडत असल्याने काहीसे कमी झाल्याचे जाणवत होते. प्रेमाचे प्रतिक असणा-या या वास्तुचा मूळ पांढरा शुभ्र रंग बदलून गेल्याने त्याची चमकच जणू नाहीशी झाली होती. त्यामुळे आता ताजला पुन्हा त्याची चमक मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. ताजसाठी वापरण्यात आलेल्या संगमरवराला पुन्हा त्याचा नैसर्गिक रंग प्राप्त व्हावा यासाठी पुन्हा एकदा 'मड पॅक'ची पद्धत वापरली जाणार आहे. एएसआयचे सुप्रीटेंडंट आर्किऑलॉजिस्ट बीएम भटनागर यांनी सांगितले की, 'शहरात वाढणा-या प्रदूषणामुळे पांढ-या रंगाचे संगमरवर पिवळे पडत चालले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस त्याची चकाकीही कमी होत चालली आहे. त्यामुळे या वास्तुला पुन्हा तिचे नैसर्गिक सौंदर्य परतवण्यासाठी एएसआयची रासायनिक शाखा मड पॅकचा वापर करणार आहे.