आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व राजकीय पक्षांनाही आरटीआय कक्षेत आणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना माहितीचा अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत आणण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावर केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि सहा राजकीय पक्षांना नोटीस जारी करण्यात आली आहे.
निवडणूक सुधारणांसाठी काम करत असलेल्या असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) ही याचिका दाखल केली आहे. त्यावर सरन्यायाधीश एच. एल दत्तू, न्यायमूर्ती अरुणकुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती अमिताव रॉय यांच्या न्यायपीठाने नोटीस बजावण्याचे आदेश दिले.