आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bring The Lord Buddha Begger Pots From Afganistan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भगवान बुद्धांचे भिक्षापात्र अफगाणिस्तानातून आणा,रघुवंशप्रसाद सिंह यांची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अफगाणिस्तानच्या संग्रहालयातील भगवान बुद्धांचे भिक्षापात्र आणून ते त्याच्या मूळ जागी बिहारच्या वैशालीमध्ये ठेवावे, अशी जोरदार मागणी राजद खासदार रघुवंशप्रसाद सिंह यांनी सोमवारी लोकसभेत केली.


शून्य प्रहरामध्ये प्रश्न उपस्थित करताना सिंह म्हणाले, भगवान बुद्ध मोक्षप्राप्तीच्या वाटेवर असताना त्यांनी वैशालीतील लोकांना भिक्षापात्र दिले होते. यानंतर पात्र कनिष्कची राजधानी पुरुषपुत्रमध्ये (आताचे पेशावर) व त्यानंतर ते कंदहारला (तत्कालीन गंधार) नेण्यात आले. यासंदर्भात अनेक इतिहासतज्ज्ञांनी लिखाण केले आहे. यादरम्यान सभागृहात गोंधळ वाढला. त्या वेळी सभापती मीरा कुमार यांनी भगवान बुद्धांबाबत प्रश्न मांडला जात असल्याचे सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. माजी परराष्‍ट्रमंत्री एस.एम. कृष्णा यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्याकडून आलेल्या उत्तरात भिक्षापात्र काबूलमध्ये असल्याचे सांगण्यात येते. रघुवंशप्रसाद सिह वैशाली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.