आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • British Airways Told To Pay Rs.90,000 For Losing Luggage In Transit From Delhi To Milan

सामान हरवल्याबद्दल ब्रिटिश एअरवेजला दंड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- प्रवाशाचे सामान हरवल्याबद्दल ब्रिटिश एअरवेजला 90 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश ग्राहक मंचाने बजावले. दिल्लीहून मिलानला जाणा-या विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाचे सामान गहाळ झाले होते.

प्रवाशाच्या बॅग हरवल्यामुळे त्याला व त्याच्या पत्नीला दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी कराव्या लागल्या. परदेशात साहित्य खरेदी करताना त्यांना मोठी रक्कम मोजावी लागली. यादरम्यान त्यांना मानसिक त्रास झाला. या कारणावरून नरेंद्रकुमार यांच्या अध्यक्षतेखालील ग्राहक मंचाने बलराज तनेजा या तक्रारकर्त्याला 50 हजार रुपये नुकसानभरपाई व खटल्याच्या खर्चापोटी 40 हजार रुपये देण्याचे आदेश बजावले. तनेजा पती-पत्नीने दिल्ली ते मिलानला जाणा-या विमानाचे तिकीट काढले. मिलानला उतरल्यानंतर बॅग हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांना दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी कराव्या लागल्या. महिन्यानंतर त्यांना दोनपैकी एक बॅग मिळाली. मात्र, या बॅगचीही मोडतोड झाली होती. विमान कंपनीने हेग करारानुसार सामानाची नुकसानभरपाई देण्यास नकार दिला. मात्र, ग्राहक मंचाने ब्रिटिश एअरवेजचा दावा फेटाळला.