आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या ब्रिटिश चॅरीटी वर्करला भारतात 1 वर्ष तुरुंगास, तिने मात्र फेटाळले आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 28 वर्षीय ब्रिटिश चॅरीटी वर्कर नारगेस अश्तारी अनाथ मुलांना मदत करण्यासाठी भारतात आली होती. पण नदीकाठी झालेल्या एका पिकनिकमध्ये एक चिमुकला बेपत्ता झाला. या प्रकरणी कोर्टाने नारगेसला दोषी ठरवले आहे. तिला एका वर्षाची शिक्षा आणि तीन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र तिने स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहे.
कोर्टाच्या या निर्णयाविरुद्ध नारगेस अश्तारीने वरच्या कोर्टात दाद मागितली आहे. तिला सध्या जामिन मिळाला असला तरी या निर्णयाने तिला जबर धक्का बसला आहे. अनाथ, गरीब आणि अंध मुलांसाठी तिने प्रिशन फाऊंडेशन नावाच्या समाजसेवी संस्थेची स्थापना केली होती. ओडिशात या संस्थेच्या माध्यमातून अनाथाश्रम आणि अंधांसाठी घरे बांधण्यात आली आहेत.
२०१४ मध्ये नदीकाठी पिकनिक आयोजित करण्यात आली होती. त्यात अनाथाश्रमाचे कर्मचारी, अंध विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. या दरम्यान एका मुलगा बेपत्ता झाला होता. त्याचा नदीत बुडून मृत्यू झाला असावा असा संशय तिने व्यक्त केला आहे. पण मला भारतातील भ्रष्टचार आणि सिस्टिमच्या गैरवापराचा फटका बसला असल्याचे ती सांगते.
पुढील स्लाईडवर वाचा, बचावात आणखी काय सांगितले नारगेस अश्तारीने....
बातम्या आणखी आहेत...