आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • British Parliament Approves Three Parent Baby Method To Prevent Genetic Disease

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगात प्रथमच : ब्रिटनमध्ये दोन आई आणि एका पित्याद्वारे होणार बाळाचा जन्म

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नवजात मुलांमध्ये आढळणाऱ्या अनुवांशिक आजारांपासून सुटका व्हावी म्हणून ब्रिटनमध्ये नव्या नियमांना मंजुरी मिळाली आहे. तीन पालकांच्या डीएनएचा वापर करून आयव्हीएफ तंत्राद्वारे मुलांना जन्म देण्याच्या प्रक्रियेला त्यात मंजुरी मिळाली आहे. ब्रिटीश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्सने याला मंजुरी दिली आहे, तर हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये त्यावर चर्चा होणार आहे. त्याठिकाणी मंजुरी मिळाल्यानंतर अशा नियमाला मंजुरी देणारा ब्रिटन पहिला देश ठरणार आहे.

ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये या मुद्यावर ऐतिहासिक चर्चा झाली. सदस्यांना आपल्या सद्सदविवेकबुद्धीचा वापर करून मते देण्याची परवानगी होती. कंझर्वेटिव्ह आणि लेबर पार्टिच्या प्रमुख नेत्यांनी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगत त्याचे समर्थन केले. त्यामुळे 128 विरुद्ध 382 मतांनी त्याला मंजुरी मिळाली.

तंत्रज्ञान
काही महिलांच्या डीएनएद्वारे त्यांच्या मुलांमध्ये प्राणघातक आजार अनुवांशिकरित्या येण्याची शक्यता असते. या तंत्रात रक्ताच्या चाचणीद्वारे महिलेला अनुवांशिक आजार आहेत का, हे तपासले जाते. डीएनएमध्ये काही गडबड असल्यास दुसऱ्या एखाद्या महिलेचे डीएनए आईच्या बिजांडामध्ये सोडले जातील. प्रयोगशाळेत शुक्राणुबरोबर फर्टिलाइज केल्यानंतर ते आईच्या शरिरात सोडले जातील. त्यामुळे आईच्या शरिरातील आजार बाळापर्यंत पोहोचणार नाहीत.

लाभ कोणाला मिळणार
या तंत्रामुळे प्राणघातक आजात आईद्वारे मुलामध्ये अनुवांशिकरित्या जाण्यावर प्रतिबंध निर्माण होऊ शकेल. त्यामुळे दरवर्षी सुमारे 150 दाम्पत्यांना त्याचा लाभ होईल. ब्रिटनमध्ये दर 6,500 पैकी एका मुलामध्ये अनुवांशिक समस्या आढळून येतात. भविष्यात त्याचा हृदय, डोळे, यकृत यांच्या गंभीर आजारांमध्ये त्याचे रुपांतर होण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या मते दुसऱ्या महिलेच्या डीएनएमुळे सुमारे 2,500 महिलांना त्याचा लाभ होऊ शकतो, त्यामुळे त्यांची मुले अनुवांशिक आजारांपासून दूर राहतील.
विरोध असण्याची कारणे...
1. विरोध करणाऱ्यांच्या मते, ही अनैतिक आणि धोकादायक पद्धत आहे. त्यामुळे डिझायनर बेबीचे चलन वाढेल.
2. कॅथलिक आणि एंग्लिकन चर्चचे नेते गर्भात कोणथ्याही प्रकारची छेडछाड करण्यास विरोध करत आहेत.