आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजधानीतील ब्रिटिशकालीन रेस्तराँ पुन्हा खवय्यांच्या सेवेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आगीत भस्मसात झालेले द एम्बेसी हे ब्रिटिशकालीन रेस्टॉरंट पुन्हा बहरणार आहे. दिल्ली शहरातील सर्वात जुन्या रेस्टॉरंटपैकी एक म्हणून याची आेळख आहे. रेस्टॉरंटचे अनेक ग्राहक दशकांपासून जोडले गेले आहेत. १९४८ पासून ते कॅनॉट प्लेसमध्ये सेवा देत होते. या रेस्टॉरंटच्या सेवेवर ब्रिटिश छाप स्पष्ट दिसून येते. हाय टी, त्यासोबत विविध ब्रिटिश पद्धतीचे स्नॅक्स ही याची वैशिष्ट्ये ग्राहकांना बांधून ठेवत होती. दिल्लीतील अनेक बदलांचा साक्षीदार म्हणून द एम्बेसीकडे पाहिले जाते. भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटनही येथील खाद्यपदार्थांचे चाहते होते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भडकलेल्या आगीत रेस्टॉरंट बंद पडले होते.दरम्यान, ३०-३५ वर्षांपासून येथे सातत्याने येणारा ग्राहकवर्गही मोठा आहे. कमल मेहरा नावाच्या व्यक्ती तर गेल्या ५० वर्षांपासून येथे येतात, खास एम्बेसी पुडिंग खायला. दररोज येथे खवय्ये येतात.

कोणी केले स्थापन?
१९४८ मध्ये जी. के. घई व पी.एन. मल्होत्रा या मित्रांनी याची स्थापना केली. येथील हाताने तयार केलेले आइस्क्रीम विशेष प्रसिद्ध होते. मल्होत्रा कुटुंबाची तिसरी पिढी सध्या हे रेस्टॉरंट चालवत आहे. २५ वर्षीय सावर मल्होत्रा याने ही खाद्य परंपरा आजही टिकवून ठेवली आहे.