आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Brown Says, Army's Exercise Was Scheduled One Month Late

सराव तर एक महिन्यानंतर होता, माजी वायूदल प्रमुख ब्राऊन यांचा खुलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 15-16 जानेवारी 2012 मध्ये लष्कराने दिल्लीकडे कूच केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी आग-यावरून पॅराट्रुपर्सचे यूनिट हिंडनकडे सरावसाठी निघाल्याचे या आधी लष्काराकडून सांगितले जात होते. मात्र, सराव तर एक महिन्यानंतर होता, असे तत्कालीन वायूदल प्रमुख एन. के. ब्राऊन यांनी सांगितले आहे. लष्कराच्या दोन तुकड्यांनी दिल्लीकडे कुच केल्याने केंद्रीय नेतृत्वात अस्वस्थता पसरली होती. ब्राऊन यांच्या खुलाशानंतर आता हे प्रकरण आणखी पेटण्याची शक्यता आहे.

लष्कराच्या दोन तुकड्यांनी दिल्लीकडे कुच केल्याने सरकार घाबरले होते, अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. मात्र त्यावेळी सरकार घाबरले असल्याच्या बातमीचा सरकार आणि लष्कार दोघांनी इन्कार केला आहे. त्यावेळचे डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल ए. के. चौधरी यांनी दोन दिवसांपूर्वीच लष्कराच्या तुकड्या सरावासाठी जात होत्या असे सांगितले आहे. त्यावेळी भारताने सी- 30 हरक्युलिस खरेदी केले होते आणि पॅराट्रूप्सला त्याचा सरावही करायचा होता. मात्र सराव एक महिन्यानंतर सुरू होणार होता ज्यात लढाऊ विमानाची क्षमता पडताळून पाहण्यात येणार होती.