आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Brutal Murder Of Girl After Rape Inside Collage Lab

आग्रा येथे लॅबमध्येच बलात्कार करुन युवतीला निर्घृणपणे मारले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी कोलकाता येथे एका रॅलीत म्हटले की, महिला सुरक्षा बिल लवकरच पारित केले जाईल. मात्र शनिवारचा दिवस पूर्णपणे महिलांच्या विरोधात राहिला. मध्य प्रदेशात स्वीडनवरुन फिरायला आलेल्या एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाला. तर, यूपीतील आग्रा येथे दयालबाग एज्युकेशनल इंस्‍टीट्यूट (डीईआई) मध्ये आणखी एका 'दामिनी'ची सामूहिक बलात्कार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर या घटनेकडे पोलिसांनी केलेल्या दुर्लक्षामुळे आग्रामधील तरुणाई रस्त्यावर उतरली व आंदोलन केले. हजारो युवक-युवतींनी यात सहभाग नोंदवत खूप गोंधळ घातला. तसेच मारेक-यांना ताबडतोब अटक करण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांनी युवक-युवतींवर लाठीमार केला. तरीही युवकांनी दयालबाग एज्युकेशन संस्थेपासून शहीद स्‍मारकापर्यंत कॅंडल मार्च काढला. या मार्चमध्ये पाचशेपेक्षा जास्त युवकांनी सहभाग घेतला. युवक-युवतींनी 'दुस-या दामिनीला न्‍याय द्या' असे नारे लगावले. आग्रामधील स्थानिक नागरिकांनी युवकांच्या आंदोलनात सहभाग नोंदवला. संबंधित मुलीचे पोस्‍टमार्टम करण्यात आले आहे मात्र रिपोर्ट सार्वजनिक करण्यास विरोध केला.

संबंधित युवतीवर नॅनो बायोटेक्नोलॉजी विभागाच्या लॅबमध्ये सर्जिकल ब्लेडने ५० पेक्षा जास्त वार केल्याचे दिसून येत आहे. तसेच त्याआधी तिच्यावर बलात्कार झाल्याची शंका आहे. लॅबमध्ये युवती अर्धनग्न अवस्थेत सापडली. मारेकरी संबंधित युवतीच्या कारमधूनच फरार झाल्याचे दिसते. मारेक-यांनी तिला क्रूरपणे मारले. त्याचे उदाहरण म्हणून मारेक-यांनी संबंधित मुलीचे स्केच काढून तिच्या पोटावर ज्या ठिकाणी ब्लेड मारले ते ठिकाणावर खूण काढली आहे.