आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीत चर्चा LOC वर गोळीबार, \'पहिली गोळी आमच्याकडून सुटत नाही\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीमध्ये गुरुवारी पाक रेंजर्सचे डीजी मेजर जनरल उमर फारूक बुर्की यांचे स्वागत करतांना बीएसएफचे महासंचालक डी.के. पाठक. - Divya Marathi
दिल्लीमध्ये गुरुवारी पाक रेंजर्सचे डीजी मेजर जनरल उमर फारूक बुर्की यांचे स्वागत करतांना बीएसएफचे महासंचालक डी.के. पाठक.
नवी दिल्ली - भारत-पाकिस्तान सीमेवर शांतता राहावी याची बोलणी सुरु असताना सीमेवर गोळीबार झाला आहे. गुरुवारी बीएसएफसोबत चर्चा करण्यासाठी पाकिस्तानी रेंजर्सचे डीजी आले आणि शुक्रवारी सीमेवर गोळीबार करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहासोबतच्या बैठकीत त्यांनी पाक रेंजर्सला सांगितले, की पहिली गोळी आमच्याकडून चालवली जात नाही.
कुठे झाली फायरिंग
जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये एलओसीवर पाकिस्तानकडून आज (शुक्रवार) पहाटे 4 ते 5 वाजता दरम्यान फायरिंग करण्यात आले. जम्मूमधील भारतीय सैन्य दलाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी सांगितले, पाकिस्तानने विनाकारण फायरिंग केली. त्यानंतर भारतीय जवानांनी त्याला सडेतोड उत्तर दिले.
फायरिंग न करण्यावर गुरुवारीच एकमत
डिसेंबर 2013 नंतर बीएसएफ आणि पाकिस्तान रेंजर्स यांच्यात प्रथमच दिल्लीत चर्चा होत आहे. गुरुवारी या चर्चेचा पहिला दिवस होता. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून रोज गोळीबार सुरु आहे. यावर तोडगा काढण्यासाठी भारतीय सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पाकिस्तानी रेंजर्स यांच्या दरम्यान महासंचालक स्तरावरील महत्त्वाची बैठक झाली. बैठकीनंतर पाकिस्तानी रेंजर्सनी सूफी संगीत आणि भारतीय मेजवानीचा आस्वाद घेतला. पाकिस्तानी पाहुण्यांसाठी बीएसएफने एका म्यूझिकल इव्हिनिंगचे आयोजन केले होते. यात प्रसिद्ध गायक हंसराज हंस यांनी पंजाबी लोकगिते सादर केली. सूफी गाण्यांबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचाही आस्वाद पाकिस्तानी सैनिकांनी घेतला.

व्हेज, नॉनव्हेज मेजवानी
सांगितीक कार्यक्रमानंतर पाकिस्तानी पाहुण्यांना भारताने खास मेजवानी दिली. त्यात शाकाहारी पदार्थांसोबतच नॉनव्हेजचेही ऑप्शन होते. भोजनाची जबाबादारी पॅरामिलटरी फोर्सेसच्या विशेष शेफच्या टीमवर सोपवण्यात आली होती. त्याआधी पाकिस्तान रेंजर्सनी गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. आता पुढील कार्यक्रम जॉइंट रेकॉर्ड ऑफ डिस्कशन असेल त्यानंतर पाक रेंजर्स मायदेशी परत जातील.

तिकडे गोळीबार-घुसखोरी, इकडे चर्चा-बातचीत
सीमे पलिकडून पाकिस्तानचा गोळीबार, दहशतवाद्यांची घुसखोरी आणि तस्करी या मुद्यांवर पाक रेंजर्स आणि बीएसएफ यांच्यात महासंचालक (डीजी) स्तरावरील चर्चा सुरु आहे. पाकिस्तानचे डायरेक्टर मेजर जनरल उमर फारुख बुर्की 16 जणांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. हे शिष्टमंडळ भारताचे बीएसएफ प्रमुख देवेंद्रकुमार पाठक यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळासोबत चर्चा करत आहे. ही चर्चा एकीकडे सुरू असताना जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा भागात शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले. भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कसे झाले पाक डीजींचे स्वागत