नवी दिल्ली - पठाणकोट एअरबेसवर हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृह खात्याने कारवाई सुरु केली आहे. सीमा सुरक्षा विभागाचे (बीएसएफ) महानिरीक्षक एन. के मिश्रा आणि कमांडेंट एस.एस.दवास यांची बदली करण्यात आली आहे. हे अधिकारी गुरदासपुर सेक्टरमध्ये तैनात होते. त्यांच्या जागेवर अनुक्रमे एन. श्रीनिवासन आणि इंद्र प्रकाश भाटिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पाच महिन्यात पंजाबात पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून दोन हल्ले झाल्याने बीएसएफवर प्रश्नचिन्ह
पंजाब सीमा भागात बीएसफ तैनात आहे. येथूनच घुसखोरी होत आहे. ऑगस्ट 2015 मध्ये गुरदासपूरमध्ये दहशतवादी घुसले होते. त्यानंतर 2 जानेवारी रोजी पठाणकोट एअरबेसवर दहशतवादी हल्ला झाला.
दोन्ही हल्ल्यांवेळी दहशतवाद्यांनी पठाणकोट जवळील दरिया उज्ज भागातून घुसखोरी केली. ही बीएसएफच्या सुरक्षेतील सर्वात मोठी चूक मानली जात आहे.