आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BSNL To Open Technical University, Offer Cybersecurity Training

बीएसएनएल स्थापणार तंत्र विद्यापीठ; अभियांत्रिकी, व्यवस्थापन कोर्स सुरू करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सरकारचा उपक्रम असलेल्या बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेडच्या वतीने लवकरच तंत्र विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे अभियांत्रिकी आणि व्यवस्थापकीय अभ्यासक्रम शिकवले जातील.

तंत्र विद्यापीठाचा प्रस्ताव ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन आणि केंद्रीय अनुदान आयोगाकडे पाठवण्यात आला आहे. त्याला सहा ते आठ महिन्यांत मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. आमचा कर्मचारी वर्ग त्यावर काम करत आहे, अशी माहिती बीएसएनएलचे संचालक अनुपमा श्रीवास्तव यांनी दिली आहे. 2008 मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शिक्षण व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे बीएसएनएलच्या प्रस्तावाला मंजुरी मिळणे फार कठीण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रस्तावाला मूर्त स्वरूप देण्यासाठी बीएसएनएलने वरिष्ठ महासंचालक जी. सी. मन्ना यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

विद्यार्थी क्षमता किती ?
बीएसएनएलच्या तंत्र विद्यापीठात एका वेळी 1500 ते 3000 विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याची सोय करण्यात येणार आहे. कंपनीच्या कॅम्पसमध्ये अशा प्रकारची सुविधा असेल. त्याद्वारे 2500-3000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची योजना आहे. विद्यापीठाचे जबलपूर येथे केंद्र आहे. त्याशिवाय इतर 16 केंद्रे देखील आहेत.