आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत दोन ठिकाणी गोळीबार : बसपच्या अब्जाधिश नेत्याची हत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीत दोन घटनांनी दहशत निर्माण झाली आहे. पहिली घटना बहुजन समाज पक्षाचे नेते दीपक भारद्वाज यांची गोळीमारून हत्या करण्यात आली आहे. तर, दुस-या घटनेत कडकडडुमा मेट्रो स्टेशनजवळ बाप-लेकीवर गोळीबार करण्यात आला आहे. यात महिला गंभीर जखमी आहे.

बसपचे अब्जाधिश नेते दीपक भारद्वाज यांच्यांवर रजोकरी भागात गोळीबार करण्यात आला आहे. तीन हल्लेखोरांनी त्यांच्या फार्महाऊसवर जाऊन गोळीबार केला. त्यांना जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले आहे.

दिल्ली पोलिस आयुक्त निरजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसप नेते भारद्वाज यांच्या रजोकरी येथील फार्महाऊसवर तीन जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलिस कंट्रोलरुमला या घटनेची माहिती १०.३० वाजता मिळाली. आयुक्तांनी सांगितले की, तीन हल्लेखोर फार्महाऊस बुक करण्याच्या बहान्याने तेथे आले. त्यांनी फार्म हाऊसच्या मालकाची विचारपूस केली. फार्महाऊसचे मालक दीपक भारद्वाज त्यांच्या समोर आल्याबरोबर हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरूवात केली. भारद्वाज यांना तीन गोळ्या लागल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला. काळ्या रंगाच्या स्कोडा गाडीतून आलेले हल्लेखोर फरार झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी नाकाबंदी सुरू केली आहे.

या हायप्रोफाईल गोळीबार प्रकरणाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोर हे सराईत असण्याची शक्यता आहे. त्यांनी हल्ला करण्याआधी या भागाची रेकी केली असण्याचीही शंका व्यक्त केली जात आहे.

दुस-या घटनेत कडकडडुमा मेट्रोस्टेशन बाहेर एक तीस वर्षीय महिला आणि तिच्या वडीलांवर गोळीबार करण्यात आला आहे. महिलेच्या पतीने गोळ्या झाडल्या असल्याचे पोलिस आयुक्त निरजकुमार यांनी सांगितले. कौटुंबिक वादातून हा हल्ला झाला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी स्लाईडला क्लिक करा.