आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बसपच्या अब्जाधीश नेत्याची पत्नी पोलिसांच्या ताब्यात, जिंदमधून दोघांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बहुजन समाज पक्षाचे अब्जाधीश नेते आणि व्यवसायीक दीपक भारद्वाज यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांना शंका आहे की, रजोकरी भागातील फार्महाऊसवर भारद्वाज यांच्यावर झालेल्या हल्ल्यात यांचा सहभाग होता. या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी या हत्ये प्रकरणी एक डझनहून अधिक लोकांची चौकशी केली आहे.

पोलिसांनी भारद्वाज यांची पत्नी रमेश कुमारी यांनाही ताब्यात घेतले असून त्यांचीही चौकशी सुरू आहे. रमेश कुमारी या भारद्वाज यांच्यासोबत राहत नव्हत्या. त्यांच्या दोन्ही मुलांकडूनही माहिती गोळा केली जात आहे. भारद्वाज यांच्यावरील हल्ला हा संपत्तीच्या वादातून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. हल्ल्यसाठी वापरण्यात आलेली स्कोडा कार हरियाणा येथून जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी बुधवारी दोन शार्प शुटरला अटक केली होती. मात्र, संशयाची सुई भारद्वाज यांच्या नातेवाईकांकडेच वळत आहे. त्यांच्या कुटुंबियांचे कॉल डिटेल्सही तपासले जात आहेत. त्यांची पत्नी त्यांच्यासोबत राहत नव्हती. तसेच मुलेही कायम त्यांच्या जवळ नसायचे. भारद्वाज यांच्या हत्येसाठी मोठी रक्कम दिली असण्याची शक्यता आहे. या हत्येचा गुंता लवकरच सोडवण्यात येईल असा विश्वास दिल्ली पोलिसांनी व्यक्त केला आहे.