आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BSP Member Walks Out Of LS While Vande Mataram Being Played

वंदे मातरम् इस्लामच्या विरोधात, बसप खासदाराचा राष्ट्रगीतावर बहिष्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- यूपीतील बसपचे खासदार शफीकुर्र रहमान बर्क यांनी पुन्हा एकदा राष्ट्रगीत वंदेमातरमचा अपमान करून वाद निर्माण केला आहे. लोकसभेत वंदेमातरमची धुन वाजताच बर्क बाहेर उठून गेले. लोकसभा अध्यक्ष मीराकुमार यांनी बसपच्या या खासदाराला इशारा दिला आहे. मात्र तो इशाराही आपण मानणार नसल्याचे मस्ती त्यांनी दाखविली आहे.

याबाबत बोलताना बर्क म्हणाले, वंदे मातरम हे इस्लामच्या विरोधात असल्याचे मी मानतो. इस्लाम त्याला परवानगी देत नाही. त्यामुळे मी मुद्दामच बहिष्कार टाकत आहे. लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांच्याकडून मला कोणतीही नोटिस मिळाली नाही. तसेच वंदे मातरमबाबत भविष्यातही आपला तोच दृष्टिकोन राहील, असे बर्क यांनी स्पष्ट केले.

बर्क यांनी सांगितले की, 1997 मध्ये स्वतंत्र्य दिनी गोल्डन जुबली समारंभात मी असेच केले होते. मी राष्ट्रगीताचा पूर्ण सन्मान करतो मात्र मला वंदे मातरम स्वीकार्य वाटत नाही. ते म्हणाले, वंदे मातरमचा घटनेत कोठेही उल्लेख नाही. हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला कोणीही यावरून अडचणीत आणू शकत नाही.

बुधवारी संसद अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर वंदे मातरम हे राष्ट्रगीत वाजवले जाते. लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी खासदारांना वंदे मातरमसाठी उभे राहण्यास सांगितले. मात्र, जसे वंदे मातरम सुरु झाले तसे बसप खासदार शफीकुर्र रहमान बर्क सदनाच्या बाहेर गेले. लोकसभा अध्यक्ष मीराकुमार यांनी वंदे मातरम राष्ट्रगीत संपल्यानंतर याबाबत बर्क यांना इशारा व समज दिली. अशा प्रकराचे वर्तन स्वीकारले जाणार नाही. भविष्यात अशी चूक पुन्हा करू नका, असे लोकसभा अध्यक्षांनी त्यांना सुनावले. भाजपने बसप खासदाराच्या वागण्याचा धिक्कार केला आहे. भाजपचे प्रवक्ते शहनवाज हुसैन यांनी म्हटले आहे की, बर्क यांनी राष्ट्रगीताबरोबरच संसदेचाही अपमान केला आहे.