आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BSP Supremo Mayawati Birthday Political Untold Story

मल्लिकाचे \'डर्टी पॉलिटिक्स\', भंवरीदेवीची तुलना केली BSP सर्वेसर्वा मायावतींशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अभिनेत्री मल्लिका शेरावत तिचा चित्रपट 'डर्टी पॉलिटिक्स'च्या प्रमोशनसाठी दिल्लीत आली आहे. यावेळी मल्लिकाने बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मल्लिकाने 'डर्टी पॉलिटिक्स'मधील तिची भूमिकेची तुलना मायावती यांच्याशी केली आहे. यावर पत्रकारांनी भंवरीदेवीसोबत मायावती यांची तुलना करण्यावर प्रश्न उपस्थित केले तेव्हा देखील मल्लिकाने अक्षेपार्ह्य शब्दात मायावती यांचा उल्लेख केला.
काही वर्षांपूर्वी राजस्थानमधील नर्स भंवरीदेवीचे अपहरण झाले आणि नंतर तिची हत्या झाली होती. तिच्या पतीने आरोप केला होता, की राजस्थान सरकारमधील मंत्री महिपाल मेदरणा यांचा यात हात होता. भंवरीदेवीवर आरोप होता, की तिने मंत्र्यांची अक्षेपार्ह्य अवस्थेतील सीडी तयार केली आणि त्याद्वारे त्यांना ब्लॅकमेल करत होती. या सीडीच्या माध्यमातून भंवरीदेवीला राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करायची होती. मल्लिकाचा 'डर्टी पॉलिटिक्स' चित्रपट 13 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मल्लिकासह अनुपम खेर, ओम पुरी, नसिरूद्दीन शाह, जॅकी श्रॉफ यांच्या भूमिका आहेत.