आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BSP Supremo Mayawati Unknown Facts Happy Birthday

मायावती@ 59 : IAS चे स्वप्न पाहाणारी तरुणी अशी झाली राजकारणातील \'बहनजी\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींनी आज त्यांच्या वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला. आज त्यांचा 59 वा वाढदिवस असून बहुजन समाज पक्ष देशभर त्यांच्या वाढदिवस 'जनकल्याणकारी दिवस' म्हणून साजरा करत आहे. मायावतींचा वाढदिवस लखनौमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरले होते, मात्र, ऐनवेळी 59 किलोचा केक कापण्यास नकार देऊन मायावती यांनी साधारण पद्धतीने वाढदिवस साजरा केला.
मायावतींचा समाजवादी पक्षावर हल्ला
वाढदिवशी मायावती यांनी कार्यकर्त्यांना समाजातील गरीब आणि असाह्य घटकांना मदत करण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, 'कार्यकर्त्यांनी सर्व समाजातील गरीब आणि दुर्बळ घटकांना गरजेच्या असलेल्या वस्तू देऊन त्यांची मदत करावी. राज्यात बसपचे सरकार होते तेव्हा या दिवशी जनकल्याणकारी अनेक योजना राबवल्या जात होत्या. यातून दलित आणि गरीबांची मदत केली जात होती. समाजवादी पक्षाचे सरकार आल्यापासून या जनकल्याणकारी योजना बंद करण्यात आल्या आहेत.'
भाजप - काँग्रेसवरही तोंडसुख
मायावतींनी यावेळी काँग्रेस आणि भाजपवरही हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, यूपीएच्या काळात काँग्रेसेने अनेक चुकीच्या योजना आणि कार्यक्रम राबवले त्याचा फटका त्यांना 2014 च्या लोकसभा निवडणूकीत बसला. त्यांच्या याच चुकीच्या धोरणांचा राजकीय फायदा भाजपने उचलला.
पुढील स्लाइडमध्ये, एका शिक्षिकेपासून मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास