आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी लाल किल्ल्याच्या प्रतिकृतीवरून भाषण करणेच योग्य - दिग्विजयसिंह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीतील लालकिल्ल्यापेक्षा त्याच्या प्रतिकृतीवरून भाषण करणे मोदींसाठी योग्य राहील अशी खिल्ली काँग्रसेचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी उडवली आहे.

छत्तीसगड येथे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी आयोजित केलेल्या विकास यात्रेच्या समारोप सोहळ्यात गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रचार प्रमुख नरेंद्र मोदी यांना भाषणासाठी लालकिल्ल्याची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. त्यावरून मोदींनी भाषण केले होते. दिग्विजयसिंह यांनी या प्रकाराची खिल्ली उडवली आहे.

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरवर दिग्विजयसिंह यांनी मोदींवर टीका केली आहे. ते लिहितात, 'मोदी गुजरातच्या विकासाचे खोटे दावे करतात. गुजरातवर 1.34 कोटी रुपये कर्ज आहे, याबद्दल मात्र ते सांगत नाही.मोदींनी ख-या लाल किल्ल्यापेक्षा खोट्या किल्ल्यावरून भाषण करणेच योग्य राहील.'

नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील असे संकेत पक्षातून वेळोवेळी दिले गेले आहेत. याआधीही 15 ऑगस्ट दरम्यान, गुजरातच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम स्थळाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी, मोदींचे आणि लालकिल्ल्याचे चित्र असलेले बॅनर लावले होते.