आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात बीटी कापसाचे उत्पादन घटल्यावरून संसदेत गदारोळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बीटी कापसाच्या उत्पादन घटीमागील कारणे शोधण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी संसद दणाणून सोडली. देशातील एकूण कापूस लागवडीपैकी 90 टक्के क्षेत्रावर बीटी कापूस घेतला जातो, असे असताना या महत्त्वाच्या नगदी पिकाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप भाजपच्या सदस्यांनी शुक्रवारी राज्यसभेत केला. त्यानंतर 20 मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.

बीटी (बॅसिलस थिरुजिनेसिस) कापसाच्या उत्पादन घटीमागील कारणांचा शोध घेऊ, असे आश्वासन सरकारच्या वतीने कृषी राज्यमंत्री चरण दास महंत यांनी दिले. महंत म्हणाले, देशात 2010-11 मध्ये प्रतिहेक्टर 499 किलो तर 2011-12 मध्ये 491 किलो प्रतिहेक्टर असे होते. 2012-13 मध्ये कापूस उत्पादन हेक्टरी 488 किलो होण्याची अपेक्षा आहे. एकूण कापूस लागवडीपैकी 90 टक्के क्षेत्र बीटी कापसाचे आहे.

आता रंगीत कापूस : कापूस संशोधन केंद्र आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) रंगीत कापूस उत्पादनाबाबत संशोधन सुरू असल्याची माहिती महंत यांनी दिली. जबलपूरच्या जवाहरलाल नेहरू कृषी संस्थेने केलेल्या संशोधनात रंगीत कापसाचे हेक्टरी 50 किलो उत्पादन मिळाले. असे महंत यांनी सभागृहात सांगितले.