आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Buddhadeb, Rahul Share Stage, Call For Saving West Bengal From TMC

ममता बॅनर्जींचे भवितव्य शनिवारी ठरणार; बंगालमध्ये सरकार काँग्रेस-डाव्यांचेच : राहुल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दक्षिण २४ परगणा, दक्षिण कोलकाता हुगळीसह एकूण ५३ विधानसभा मतदारसंघात शनिवारी मतदान होत आहे. त्यात राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसह अनेक दिग्गजांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. या टप्प्यात ३० एप्रिल रोजी १.२४ कोटी मतदार ३४९ उमेदवारांची िनवड करण्यासाठी १४,५६५ मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत.

या टप्प्यात प. बंगालसह संपूर्ण देशाचे लक्ष भवानीपूर मतदारसंघावर केंद्रित असणार आहे. कारण येथून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविराेधात भाजपचे उमेदवार सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस, काँग्रेस डाव्या पक्षांनी मिळून दीपा दासमुन्शी यांना िनवडणूक रिंगणात उतरवले आहे. २०१४ ची लोकसभा िनवडणूक २०१५ च्या कोलकाता महापालिकेच्या िनवडणुकीचे िनकाल लक्षात घेता भाजप येथे ममतांची कोंडी करू शकते. प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी दीपा दासमुन्शी यांनी आपण बंगालच्या बेटी असल्याचा दावा मत मागत आहेत. दीपा यांनी भाजपचे उमेदवार चंद्रकुमार बोस यांच्यावर ते प. बंगालमध्ये अदृश्य व्यक्ती असून त्यांना कुणीही ओळखत नाही, अशी टीका केली.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी दक्षिण परगणा मतदारसंघात आयोजित एका प्रचारसभेत बोलताना प. बंगालमध्ये पुढील सरकार काँग्रेस डाव्या पक्षांचेच बनेल, असा दावा केला. ते म्हणाले, "राज्यातील भ्रष्टाचार नष्ट करण्याचे काम आमची आघाडी करणार आहे. २५ एप्रिल रोजी झालेल्या चार टप्प्यांच्या मतदानातून राज्यातील जनतेने या वेळी काँग्रेस डाव्या पक्षांच्या पारड्यात मत टाकण्याचे आधीच ठरवून टाकले आहे.

केंद्रामध्ये एक सरकार असे आहे, जे फेअर अँड लव्हली तथा सूट -बूटवाल्यांसाठी काम करते, तर पश्चिम बंगालमध्ये शारदा नारदांचे सरकार आहे.' या सभेला माजी माकपचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्यदेखील उपस्थित होते.

पोस्टर फाडले; दहा वर्षीय मुलीस मारहाण
तृणमूलकाँग्रेसच्या नेत्याचे पोस्टर फाडले म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी १० वर्षी मुलीला मारहाण केली. दक्षिण २४ परगणामध्ये ही घटना घडली. मुलीने पतंग बनवण्यासाठी पोस्टर काढून घेतले होते. त्या वेळी सहा जणांनी मिळून तिला मारले. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून तृणमूलच्या लोकांविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे.