आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Budget Session: JNU Row To Be Debated In Rajya Sabha

राज्यसभेत जेएनयूचेच वारे, एनडीए होणार आक्रमक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राज्यसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ जेएनयू मुद्द्यावरील चर्चेने होईल. व्यापार सल्लागार समितीच्या बैठकीत सत्तारुढ आणि विरोधी पक्षांच्याही खासदारांनी या मुद्द्यावर तत्काळ चर्चेची मागणी केली होती.

केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले, या मुद्द्यावर सरकारकडे लपवण्यासारखे काही नाही. काँग्रेस जेएनयूचा वाद अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी जोडू पाहत आहे. त्यात इतर विरोधी पक्षांचीही साथ आहे. काँग्रेसच्या बैठकीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी रणनीतीला अंतिम रूप दिले. दुसरीकडे, काँग्रेस या मुद्द्याला ‘देशभक्त विरुद्ध देशद्राेही’ असे रूप देईल, असे भाजपला वाटतेे. भाजपाध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत डावपेच आखले. आक्रमक पद्धतीनेच काँग्रेस व विरोधकांना तोंड देण्याचे त्यात ठरवण्यात आले.

चर्चा व्हावी : राष्ट्रपती मुखर्जी
मंगळवारपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अभिभाषणात सभागृहात कामकाजात अडथळे िनर्माण होण्यापेक्षा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा व्हावी, ही अपेक्षा व्यक्त केली.