आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत चार मजली इमारत कोसळली, दोन महिलांसह तिघांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीतील विष्णू गार्डन भागात चार मजली इमारत कोसळली असून त्यात दोन महिलांसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबलेले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान बचाव कार्य वेगाने सुरु असून दहा लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. फायर ब्रिगेड, एनडीआरएफचे जवान बचाव कार्य करत आहेत. इमारतीच्या बेसमेंटचे काम सुरु होते, त्यामुळे इमारत कोसळल्याचे सांगितले जात आहे.
पश्चिम दिल्लीचे पोलिस उपअधीक्षक पुष्पेंद्र कुमार यांनी सांगितले, की विष्णू गार्डन भागातील एक चार मजली इमारत कोसळली असून बचाव कार्य सुरु आहे. इमारत कोसळल्यानंतर वीजेच्या तारा तुटल्या त्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की त्यांना घटनेची माहिती रात्री नऊ वाजता मिळाली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधीत छायाचित्र
बातम्या आणखी आहेत...