नवी दिल्ली- दक्षिण दिल्लीतील इंद्रलोक भागात असलेल्या तुलसी नगरात एक चार मजली इमारत आज (शनिवार) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास कोसळली. या दूर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. आणखी काही जण ढिगार्याखाली अडकल्याचे शक्यता वर्तवली जात आहे. ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे. ही घटना सकाळी नऊ वाजता घडली. दिल्ली महापालिकेतील दोन अधिकार्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रलोक भागातील तुलसी नगरात 50 वर्षे जुनी बेकायदा इमारती कोसळली. या दूर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी महापालिका आणि अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. आतापर्यंत 14 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमीनां रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दूर्घटनेनंतर एमसीडीच्या दोन अभियंत्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
दूर्घटनाग्रस्त इमारतीत चार परिवार राहत होते. दिल्ली महापालिकेचे नगराध्यक्ष योगेंद्र चंदोलिया यांनी घटनास्थळाची पाहाणी केली. जखमींची विचारपूस केली. इमारत फार जुनी होती. इमारत तोडण्याचे काम सुरु होते.
पुढील स्लाइडवर पाहा, दूर्घटनेची छायाचित्रे...
(फोटो- जमिनदोस्त झालेली इमारतीचा ढिगारा उपसताना बचाव पथक)