आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलेट ट्रेनमध्ये स्वार होण्यास भारत सज्ज आहे का? वाचा, दोन तज्ज्ञांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली - दिल्ली - आग्रा हे 195 किलोमीटर अंतर आज (गुरुवार) सेमी हायस्पीड ट्रेनने 100 मिनिटांत कापले आहे. ताशी 160 वेगाने धावलेल्या या ट्रेनने भारतीयांच्या बुलेट ट्रेनच्या स्वप्नांना अधिक ठळक केले आहे. सेमी हायस्पीड ट्रेनचा दिल्ली-आग्रा हा प्रवास यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रातून मुंबई - पुणे, मुंबई - औरंगाबाद आणि मुंबई - कोल्हापूर या बुलेट ट्रेन केव्हा सुरु होणार असा सवाल विचारला जात आहे. या ट्रेन सुरु झाल्यातर मुंबई - औरंगाबाद आणि मुंबई - कोल्हापूर हे अंतर नऊ - दहा तासांवरुन चार तासांंवर येईल असेही सांगितले जात आहे. मात्र, देशात बुलेट ट्रेन सुरु करणे हे भारतीय रेल्वे समोरचे मोठे आव्हान असणार आहे.
रेल्वे मंत्रालयाचे माजी सल्लागार सुनील कुमार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना भारतीय रेल्वे समोरील आव्हाने सांगितली. ते म्हणाले, 'भारतात रेल्वे रुळांवर जनावरे येत-जात राहातात. रेल्वे मार्गादरम्यान भूयार, पुल, मानवरहित क्रॉसिंग असतात. या समस्या सोडवण्यासाठी रेल्वेला दोन हजार किलोमीटरची फेसिंग करावी लागणार आहे.'
सध्या असललेल्या रेल्वे रुळांवरुन हायस्पीड रेल्वे धावणे शक्य नाही. या रुळांवरील ट्रॅफिक गरजेपेक्षा जास्त आणि संथ आहे. भारतात असलेल्या 64 हजार किलोमीटर पेक्षा जास्त लांब रेल्वे ट्रॅक पैकी केवळ 15-20 टक्केच मार्ग ताशी 170 किमी वेगांच्या रेल्वेचा भार वाहू शकतात.
नवीन रेल्वे रुळांसाठी मोठ्या प्रमाणात पैसा आणि जमीन अधिग्रहण करावे लागणार आहे. त्यासाठी वेळ देखील खूप जाणार आहे. जपानमध्ये 1964 साली प्रथम हायस्पीड ट्रेन धावली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी 2240 किलोमीटरचा ट्रॅक विकसीत केला आहे. सामान्य रेल्वे रुळांपेक्षा यांना अधिक खर्च येतो. एक किलोमीटर रेल्वे रुळांसाठी साधारण तीन कोटी रुपये खर्च आपेक्षीत आहे. तर, बुलेट ट्रेनसाठीच्या ट्रॅकचा खर्च 8 कोटी रुपयांपर्यंत आहे. एक बुलेट ट्रेनच्या किंमतीमध्ये सर्वसाधारण रेल्वेचे पाच हजार डबे विकत घेता येता. एवढी मोठी तफावत या दोन्ही रेल्वेंमध्ये आहे.