आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुराडी नरसंहार: मित्राने तीन दिवसांत 6 कुटुंबीयांची केली हत्या, मुलांचे मृतदेह सिमेंटने पुरले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बहुजन समाजवादी पक्षाचे नेते चौधरी मुनव्वर हसन यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील जणांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी बुराडी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंट मुनव्वर यांचा विश्वासू मित्र शाहीद खान ऊर्फ बंटी निघाला आहे. त्याचा मित्र दीपक, फिरोज जुल्फिकारंचाही या गुन्ह्यात समावेश आहे. आणखी दोन आरोपींचा पोलिस सध्या शोध घेत आहेत.
 
बंटीने पोलिसांना सांगितले की, मुनव्वर त्याच्या घरातील सदस्यांची वेगवेगळ्या ठिकाणी हत्या करून संपूर्ण कुटुंबच संपवले. आरोपी बंटी हा मुनव्वर यांच्यासोबत व्यवसायात भागीदार होता. पोलिसांच्या मते, २० लाख रुपये तसेच संपत्ती बळकावण्याच्या उद्देशाने त्यांनी ही हत्या केली आहे.

बहिणीशी भेटवण्याच्या बहाण्याने मुनव्वर कुटुंबीयांचा केला घात : बंटीनेसांगितले की, मुनव्वरने त्याच्याशी विश्वासघात केल्यामुळे साथीदारांसोबत मिळून आपण हे हत्याकांड घडवून आणले. ठरलेल्या योजनेनुसार तो २० एप्रिल रोजी त्याच्या बहिणीला भेटवण्याच्या बहाण्याने मुनव्वर यांची पत्नी सोनिया ऊर्फ इशरत, मुलगी आर्शी आणि आरजूला त्याच्या कारमधून मेरठला घेऊन गेला. २१ एप्रिल रोजी तिथून परतत असताना मेरठ आणि सहारनपूरमध्ये दौराला भागात चौघांची हत्या करून मृतदेह लपवून टाकले. त्यानंतर २२ एप्रिल रोजी मुनव्वरच्या आकिब आणि शाकिब या दोन्ही मुलांची बुराडीतील मुनव्वर यांच्या कार्यालयात हत्या करून मृतदेह पुरून टाकले.
 
आधी जामीन मिळवला आणि मग केली हत्या
मुनव्वरची संपत्ती बळकावण्यासाठी बंटीने आधी त्यांच्या कुटुंबीयांची हत्या केली. त्यानंतर बुराडी पोलिसांमध्ये मुनव्वर यांची पत्नी आणि मुले हरवल्याची तक्रारही दाखल केली. याचाच आधार घेत अनेक दिवसांपासून कैदेत असलेल्या मुनव्वर यांना बंटीने १७ मे रोजी पॅरोलवर सोडवले आणि रचलेल्या कटानुसार २० मे रोजी गोळ्या घालून हत्या केली.
बातम्या आणखी आहेत...