आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बर्गर किंग’ च्या पुढ्यात लाखभर खवय्ये! लॉचिंगआधीच एका आठवड्यात चाहते कमावले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगात दुस-या क्रमांकाची फूड चेन असलेल्या ‘बर्गर किंग’ रेस्टॉरंटने भारतात लाँचिंगपूर्वीच असंख्य चाहते कमावले आहेत. बर्गर किंग इंडियाच्या फेसबुक पेजवर एका आठवड्यात एक लाख फॅन्सची नोंदणी झाली आहे. त्यामुळे २०१४ या वर्षअखेरीस सुरू होणा-या या रेस्टॉरंटला ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळण्याची चिन्हे आहेत. डिसेंबरपर्यंत या ब्रँडचे दिल्ली आणि मुंबईत प्रत्येकी सहा आउटलेट्स सुरू होतील. बर्गर किंग इंडियाच्या प्रमुख मार्केटिंग अधिकारी उमा तलरेजा म्हणाल्या की, बर्गर किंगला भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर चाहते मिळण्याची अपेक्षा नव्हती.

फन अ‍ॅक्टिव्हिटिजद्वारे लक्ष वेधले
बर्गर किंग ऑफ इंडियाने फेसबुकवर दोन फन अ‍ॅक्टिव्हिटिज घेतल्या. त्यापैकी एका प्रकारात ज्या लोकांनी यापूर्वी ‘बर्गर किंग’ची चव चाखली आहे त्यांनी आपला अनुभव सांगावा. तसेच दुस-या प्रकारात एका शब्दात आदर्श ब्रँडची व्याख्या करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते.

बर्गर किंग
- ७ दिवसांपूर्वी फेसबुक पेज लाँच
- १ लाख सहा हजारांहून अधिक चाहते
- १९५४ मध्ये अमेरिकेतील मियामी येथे फूड चेनची सुरुवात
- २ क्रमांकावरील जागतिक फूड चेन
-११ अब्ज ग्राहक जगभरातील बर्गर किंग रेस्टॉरंटला भेट देतात
-१३००० रेस्टॉरंट जगभरात पसरले आहेत.