आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Businessman Dipak Bhardwaj Was Taking The Girls At His Home

दररोज वेश्यांना घरी आणणारे दीपक भारद्वाज पत्न‍ीलाही करत होते मारहाण!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दि‍ल्‍ली- बसपचे अब्जाधीश नेते दीपक भारद्वाज यांच्या हत्येचे गूढ उकलले असून त्यासोबत धक्कादायक माहीतीही समोर आली आहे. भारद्वाज यांच्या हत्येत त्यांच्या धाकट्या मुलाचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या बाप-लेकाची एकच गर्लफ्रेंड असल्याचेही स्पष्ट झाले आहे आणि याच कारणावरून मुलाने आपल्या बापाचा काटा काढला होता.

दुसरीकडे दीपक भारद्वाज हे आपल्या घरीच दररोज वेश्यांना आणून त्यांच्यासमोरच ते त्यांच्या पत्नीला मारहाण करत होते. याच कारणामुळे भारद्वाज आणि त्यांच्या पत्नीत नेहमी वाद असत. उल्लेखनीय म्हणजे त्यांच्यात वाद होण्यामागे भारद्वाज यांचे वकील बलजीत सिंग यांची महत्त्वाची भूमिका होती. बलजीत हेच दोघांत कशा प्रकारे वाद होतील, याच्यासाठी बलजीत प्रयत्न करीत असत. त्यामुळे आता बलजीत सिंग यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पोलिस सूत्रांनुसार, वकील बलजीत सिंग हे या प्रकरणातील मास्टरमाइंड आहेत. भारद्वाजांचे कुटूंब उद्‍ध्वस्त करण्‍यात बलजीत सिंग यांनी कोणतीही कसर सोडलेली नाही. बलजीत यांनी भारद्वाजांच्या कोट्यवधींच्या संपत्तीही हडपली आहे. भारद्वाज आणि त्यांचा मुलगा नितेश या दोघांनाही बलजीत एकमेंकांविरोधात भडकवत होता.

एका पोलिस अधिकार्‍याने नाव न प्रसिद्ध करण्‍याच्या अटीवर सांगितले की, बलजीत सिंग हा व्यवसायाने वकील आहे. परंतु भारद्वाज यांच्या संपर्कात आल्यानंतर तो त्यांच्या प्रॉपर्टीचा व्यवसायाचे काम पाहत होता. बलजीत पूर्वी एअरपोर्टजवळील नांगली देवास गावात राहत होता. त्यानंतर त्याने काही दिवसातच 'वसंतकुंज'मध्ये फ्लॅट खरेदी केला होता. त्यानंतर मा‍त्र बलजीत याने भारद्वाज आणि त्यांचा मुलगा नितेश यांच्यात दरी निर्माण करून त्यांना एकमेकांपासून विभक्त केले.

बलजीत यानेच नितेश आणि त्याची पत्नी प्रियांका तिवारी यांची काडीमोड करून दिली होती. बलजीत हा मास्टरमाइंड असून नितेशसोबत झालेले बोलने तो रेकॉर्ड करून घेत होता. त्यानंतर नितेशला तो ब्लॅकमेलही करत होता. आपल्या बापाच्या हत्येची सुपारी देताना बलजीतने नितेशचे बोलणे रेकॉर्ड केल्याचाही पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.