आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Businessman Dipak Bhardwaj Was Taking The Girls At His Home

दीपक भारद्वाज घरीच आणायचे तरुणी, वकील होता मास्‍टरमाइंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दि‍ल्‍ली- बसपचे अब्जाधीश नेते दीपक भारद्वाज यांच्या हत्येचे गूढ उकलले असून त्यासोबत धक्कादायक माहीतीही समोर आली आहे. भारद्वाज यांची हत्या करण्यात त्यांच्या धाकट्या मुलाचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या बाप-लेकाची एकच गर्लफ्रेंड असल्याचेही स्पष्ट झाले आहे आणि याच कारणावरून मुलाने आपल्या बापाचा काटा काढला होता.

दुसरीकडे दीपक भारद्वाज हे आपल्या घरीच दररोज वेगवेगळ्या तरुणी घेऊन येत असल्याने भारद्वाज आणि त्यांच्या पत्नीत नेहमी वाद असत. उल्लेखनीय म्हणजे त्यांच्यात वाद होण्यामागे भारद्वाज यांचे वकील बलजीत सिंग यांची महत्त्वाची भूमिका होती. बलजीत हेच दोघां कशा प्रकारे वाद होतील, एकमेकांचे त्यावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पोलिस सूत्रांनुसार, वकील बलजीत सिंग हे या प्रकरणातील मास्टरमाइंड आहेत. भारद्वाजांचे कुटूंब उद्‍ध्वस्त करण्‍यात बलजीत सिंग यांनी कोणतीही कसर सोडलेली नाही. बलजीत यांनी भारद्वाजांच्या कोट्यवधींच्या संपत्तीही हडपली आहे. भारद्वाज आणि त्यांचा मुलगा नितेश या दोघांनाही बलजीत एकमेंकांविरोधात भडकवत होता.