आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Businessman Ratan Tata Is Eager To Work With Nitin Gadkari

गडकरींसाेबत कामासाठी उत्सुक, रतन टाटांची इच्छा, 'एक्स्प्रेस वे'चे कौतुक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गडकरींच्या दिल्लीत निवासस्थानी चर्चा करताना उद्याेगपती रतन टाटा. - Divya Marathi
गडकरींच्या दिल्लीत निवासस्थानी चर्चा करताना उद्याेगपती रतन टाटा.
नवी दिल्ली - ‘मुंबई – पुणे एक्स्प्रेस-वे हा दूरदृष्टी असलेला प्रकल्प हाेता. त्यामुळे मी तुमचा चाहता बनलाे अाहे’ अशा शब्दांत सुप्रसिद्ध उद्याेगपती रतन टाटा यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचे काैतुक करत त्यांच्यासाेबत काम करण्यात उत्सुकता दर्शविली.

रतन टाटा यांनी गुरुवारी सकाळी गडकरींची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांच्यात तासभर देशातील सामाजिक, अार्थिक व अाैद्याेगिक विकासाबाबत चर्चा करण्यात अाली. या वेळी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित हाेते. या अनाैपचारिक चर्चेत राज्यातील विकासकामांचा अाढावा घेऊन त्याबाबत समाधान व्यक्त करण्यात अाले. देशाच्या प्रगतीसाठी पायाभूत सुविधा कशा निर्माण करायच्या याबाबत टाटांनी गडकरींना काही ‘टिप्स’ दिल्यात.

विदर्भाचा अनुशेष, विकास अाणि शेतकऱ्यांच्या अात्महत्यांबाबत त्यांनी मनमाेकळी चर्चा केली. विदर्भाच्या विकासासाठी टाटा ट्रस्ट काम करेल, अशी ग्वाही टाटांनी दिली. गडचिराेलीतील नक्षलग्रस्त क्षेत्रात एकल विद्यालयांना अार्थिक मदत करण्यास टाटा यांनी सहमती दर्शवली. विदर्भातील शेतकऱ्यांच्या अात्महत्याग्रस्त भागात टाटा ट्रस्ट अध्ययन करणार असून प्रभावित कुटुंबीयांना मदत करणार अाहे. विदर्भातील कर्करुग्ण, अपंग, सिकलसेलच्या रुग्णांना अार्थिक सहकार्य करण्याचा टाटा यांनी मानस व्यक्त केला. जमशेटजी टाटा यांनी नागपूरमध्ये जाे विकास केला त्यांच्या स्मृती जाेपासण्यासाठी नागपूरमध्ये स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी रतन टाटा यांना दिली.

चंद्रपूर जिल्ह्यातील मुल, जिवती, पाेंभुर्णा या तालुक्याच्या विकासासाठी टाटा ट्रस्टने सूक्ष्म नियाेजनाबाबत केलेल्या सहकार्याबद्दल वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रतन टाटा यांचे अाभार मानले.