आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UPA-NDA भांडणात माझा फुटबॉल झाला, विदेशात फरार माल्यांचे ट्विट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माल्या यांच्यावर 9 हजार कोटींचे कर्ज थकित आहे. ते विदेशात निघून गेले. - Divya Marathi
माल्या यांच्यावर 9 हजार कोटींचे कर्ज थकित आहे. ते विदेशात निघून गेले.
नवी दिल्ली - बँकांचे 9 हजार कोटी रुपये बुडवून विदेशात पळून गेलेले मद्यसम्राट विजय माल्याविरोधात 2 दिवसांपूर्वी अजामीनपात्र वॉरंट जारी झाले. त्यानंतर माल्या यांनी एकामागे एक अनेक ट्विट करत यूपीए आणि एनडीए सरकारमध्ये माझा फुटबॉल झाल्याचे म्हटले आहे. दोन सरकारांमध्ये मला टोलवले जात असताना दाद मागण्यासाठी रेफरीही नाही, असा अगतिकतेचा आव माल्यांनी आणला आहे.
 
माल्या यांनी गुरुवारी अनेक ट्विट केले. त्यात लिहिले, की माझ्या विरोधात असलेले आरोप आणि त्यासंबंधीचे पुरावे तपास यंत्रणा आणि मीडिया मोडतोड करुन सादर करीत आहे.
- एका ट्विटमध्ये माल्यांनी लिहिले, 'सीबीआयच्या आरोपावरुन मला आश्चर्य वाटत आहे. त्यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहे. पोलिसांना उद्योग आणि अर्थकारणातील किती कळते.' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

- दुसऱ्या एका ट्विटमध्ये ते लिहितात, 'मीडिया आनंदाने एका पिचसारखी वापरली जात आहे तर मला फुटबॉलसारखे वागवले जात आहे. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी दोन संघ यूपीए आणि एनडीए यांची ही मॅच आहे. दुर्देवाने यात कोणी पंचही नाही.'

भाजपनचा यूपीए-2 सरकारवर आरोप 
- भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत म्हटले होते, की माल्या यांना 2004 मध्ये पुन्हा 2008 मध्ये कर्ज दिले गेले. विशेष म्हणजे तेव्हा त्यांना नॉन परफॉर्मिंग अॅसेट (NPA) घोषित करण्यात आले होते. 
- संबित पात्रा यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनाही दोषि धरत त्यांच्या सांगण्यावरुन प्राप्तिकर खात्याने माल्यांविरोधात कठोर भूमिका घेतली नाही आणि त्यांचे अकाऊंट फ्रीज केले नसल्याचा आरोप केला होता. 

- मनमोहनसिंह यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.
- पात्रा यांनी पत्रकार परिषदेत सवाल केला होता, 'नेहमी हा प्रश्न विचारला जातो की माल्या यांचे रेटिंग एवढे खराब असताना त्यांना 9 हजार कोटींचे कर्ज कसे मिळाले? त्याचे उत्तर आहे की कोणती तरी शक्ती त्यांना मदत करत होती. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत.'
- माल्या बँकांचे 9000 कोटी रुपये थकवून गेल्या वर्षापासून देश सोडून ब्रिटनमध्ये स्थायिक झाले आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)