आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय किंवा धार्मिक मजकूर लिहिला असेल तरच नोटा अवैध, इतर बँकेत भरता येणार : RBI

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RTI च्या उत्तरात नोटांबाबत माहिती स्पष्ट केली. - Divya Marathi
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RTI च्या उत्तरात नोटांबाबत माहिती स्पष्ट केली.

जोधपूर/नवी दिल्ली - नोटबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या 500 आणि 2000 च्या नोटांवर लिहिलेले असल्यास बँका त्या नोटा अवैध ठरवू शकणार नाही. नियमानुसार अशा प्रकारच्या नोटा मान्य असतील आणि त्या बँकांमध्ये जमा कराव्या लागतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एका आरटीआयच्या उत्तरात हे स्पष्ट केले आहे. फक्त ज्या नोटांवर धार्मिक खूण अथवा राजकीय घोषणा लिहिल्या असतील त्याच नोटा अवैध ठरवल्या जातील, असे आरबीआयने म्हटले आहे. नोटबंदीदरम्यान आधी 10 च्या नोटवर आणि नंतर नव्या नोटांवर 'सोनम गुप्ता बेवफा है' लिहिण्याचा ट्रेंड आला होता. 


कोणी दाखल केली होती आरटीआय? 
- राजस्थान हायकोर्टाचे वकील रझ्झात के. हैदर यांनी आरटीआय दाखल केली होती. त्यांनी आरबीआयला विचारले होते 500 आणि 2000 च्या नोटांवर पेन आणि मार्करने काही लिहिल्यानंतर किंवा स्टेपल केल्यानंतर या नोटा बँकेत जमा करता येतील की नाही?' 
- दुसरा प्रश्न होता, ज्या नोटांवर धार्मिक चिन्हं आणि राजकीय घोषणा लिहिलेल्या असतील, बँका त्या नोटा घेणार की नाही? 


आरबीआयने काय दिले उत्तर?
- बँकेचे मुख्य माहिती अधिकारी पी. विजय कुमार यांच्याकडून आरटीआय दाखल करणाऱ्याला उत्तर पाठवण्यात आले. 
- आरबीआयने म्हटले, नव्या नोटा (500 आणि 2000) सह भारतीय चलनातील इतर कोणत्याही नोटांवर काही लिहिलेले असल्यास त्या अवैध ठरणार नाहीत. ग्राहक अशा नोटा बँकांमध्ये जमा करू शकतात. 
- दुसऱ्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, नोट रिफंड रूलनुसार एखादी धार्मिक घोषणा किंवा चित्र अथवा राजकीय घोषणा असलेल्या नोटा रद्द मानल्या जातील.  


काय आहे प्रकरण?
- वकील हैदर यांच्या मते, गेल्या काही दिवसांपासून राजस्थानच्या बहुतांश बँकांमध्ये नोटीस लावण्यात आल्या होत्या. त्यात असे म्हटले गेले की, 500 आणि 2000 च्या नोटांवर पेनने काहीही लिहिल्यास ते स्वीकारले जाणार नाही.  
- पण आता आरबीआयने नोटांसंबंधीचे नियम स्पष्ट केले आहेत. ज्या बँका नोटा घेणार नाहीत त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. 

 

बातम्या आणखी आहेत...