आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटनिवडणुकीत भाजपला 5 जागा; आपची अनामत जप्त, कर्नाटकच्या दोन्ही जागा काँग्रेसला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
9 एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदानाचे निकाल गुरुवारी जाहीर झाले - Divya Marathi
9 एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदानाचे निकाल गुरुवारी जाहीर झाले
नवी दिल्ली - दिल्ली, राजस्थान आणि मध्यप्रदेशसह एकूणच 8 राज्यांतील 10 विधानसभा जागांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीचे निकाल गुरुवारी पुढे आले. .यात 10 पैकी तब्बल 5 जागा भाजपने जिंकल्या असून इतर एका ठिकाणी आघाडीवर आहे. कर्नाटकातील दोन्ही जागांवर काँग्रेसने विजय मिळविला. तर, तृणमूल काँग्रेसने आणि झामुमोने प्रत्येकी एक-एक जागा काबिज केली.  मध्य प्रदेश, आसाम, राजस्थान, कर्नाटक, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि झारखंड येथे 9 एप्रलि रोजी मतदान पार पडले. तर, जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग येथील लोकसभा जागेवर हिंसाचाराच्या सावलीत गुरुवारी मतदान झाले.
 
- हिमाचल प्रदेशच्या भोरंज येथून भाजप उमेदवार अनिल धिमान यांनी तब्बल 8290 मतांनी पोटनिवडणुकीत विजय मिळविला.
- दिल्लीच्या राजौरी गार्डन विधानसभा जागेवर भाजप-अकाली दल युतीचे उमेदवार मनजिंदर सिंग सिरसा विजयी झाले.  सिरसा यांनी 14,652 मतांनी विजय नोंदविला.
- आसामची धेमाजी विधानसभा जागा सुद्धा भाजपने काबिज केली. भाजप उमेदवार रानोज पेंगू यांनी 9,285 मताधिक्य मिळविले.
- राजस्थानच्या धौलपूर विधानसभा जागेवर भाजपच्या उमेदवार शोभाराणी कुशवाहा यांनी काँग्रेसचे प्रतिस्पर्धी बनवारीलाल शर्मा यांना 38,648 मतांनी पराभूत केले. 
- मध्य प्रदेशच्या उमरिया जिल्ह्यातील बांधवगड येथे सुद्धा भाजपचाच विजय झाला. भिंड जिल्ह्यातील अटेर येथे भारतीय जनता पक्ष सर्वात पुढे आहे. 
 
या जागांवर काँग्रेस, तृणमूल विजयी 
- पश्चिम बंगालच्या कांठी जागेवरून तृणमूल काँग्रेस उमेदवार विजय झाले. 
- कर्नाटकच्या नंजनगड आणि गुंदूलपेट या दोन्ही जागा काँग्रेसने  मिळविल्या आहेत. 
- यासोबतच झारखंडच्या लिट्टीपट्टा येथे झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) च्या उमेदवारांनी विजय मिळविला.
 
दिल्लीत आपची अनामत सुद्धा जप्त
दिल्ली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप 51.99% मतांसह प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला. 33.23% मतांसह काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. तर, केवळ 13.11% मते मिळविणारे आम आदमी पक्षाचे उमेदवार हरजीत सिंग यांची अनामत रक्कम सुद्धा जप्त झाली. 
 
काश्मीरच्या अनंतनाग लोकसभा जागेवर फेर मतदान
- जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदान केंद्र क्रमांक 39 वर पुन्हा मतदान घेतले जात आहेत. 9 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी हिंसाचार झाल्याने येथे फक्त 7 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे, निवडणूक 
आयोगाने या ठिकाणी पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले. 

कुठे किती टक्के मतदान
- मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात 60%, उमरिया जिल्ह्यात 67% आणि दिल्लीतील राजौरी येथे 44% मतदानाची नोंद आहे. 
- आसामच्या धेमाजी जागेवर 67%, हिमाचल प्रदेशच्या भोरंज येथे 63%, पश्चिम बंगालच्या कांठी येथे सर्वाधिक 80% मतदान झाले. 
- जम्मू आणि काश्मीरतच्या अनंतनाग लोकसभा जागेसाठी केवळ 7.14% मते पडली. तर, राजस्थानच्या धौलपुर येथे 77% मतदानाची नोंद झाली.
- कर्नाटकच्या नंजनगडमध्ये 76% आणि गुंदलूपेट येथे 78% मतदान झाले.
 
बॅलेट पेपरवर निवडणूक करण्याची होती मागणी
- मध्यप्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील अटेर आणि उमरिया जिल्ह्यातील बांधवगड विधानसभा जागांवर पोटनिवडणुकीच्या वेळी मतदान पावतीवर वाद झाला होता. यानंतर भिंड येथील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना हटवण्यात आले. काँग्रेसने या ठिकाणी बॅलेट 
पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली होती. 
- यानंतर अरविंद केजरीवाल यांनीही ईव्हीएमवर सवाल उपस्थित केले होते. त्यावर निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत वापरलेले ईव्हीएम पोटनिवडणुकीत न वापरण्याचा निर्णय घेतला.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...