आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सी. पी. जोशी प्रभारी रेल्‍वेमंत्री, सिब्‍बल यांच्‍याकडे कायदा मंत्रालयाचा कार्यभार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- पवनकुमार बन्‍सल आणि अश्विनीकुमार यांची मंत्रिमंडळातून गच्‍छंती झाल्‍यानंतर त्‍यांच्‍या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, बन्‍सल यांच्‍या जागी सी. पी. जोशी यांच्‍याकडे प्रभारी रेल्‍वेमंत्रीपद देण्‍यात येणार आहे. तर कपिल सिब्‍बल यांच्‍याकडे कायदा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्‍यात येईल.

लाचखोरी प्रकरण आणि कोळसा खाणवाटप घोटाळ्यात सीबीआयच्‍या शपथपत्रामुळे बन्‍सल आणि अश्विनीकुमार अडचणीत आले होते. त्‍यांच्‍या राजीनाम्‍याची जोरदार मागणी होत होती. अखेर दोघांनी काल राजीनामा दिला. त्‍यानंतर त्‍यांच्‍या जागेवर कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज दुपारी राष्‍ट्रपती भवनातून यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्‍यात आली. सी. पी. ठाकूर यांच्‍याकडे दळणवळण खाते आहे. त्‍यासोबतच रेल्‍वेचा अधिरिक्त कार्यभार त्‍यांना मिळाला आहे. तर सिब्‍बल यांच्‍याकडे दूरसंचार खाते आहे. यापूर्वीही त्‍यांच्‍याकडे कायदा मंत्रालयाचा कार्यभार होता.

काय घडले काल सायंकाळी? वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये....