आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 हजार कोटींच्या मनी लाँडरिंग रॅकेटमधील सीएला अटक, लालूंची मुलगी मिसाच्या कंपनीशीही संबंध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आठ हजार कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग रॅकेट प्रकरणी ईडीने राजेशकुमार अग्रवाल या सनदी लेखापालाला (सीए) अटक केली आहे. या रॅकेटचा संबंध दिल्लीतील दोन व्यावसायिक बंधू आणि काही राजकीय नेत्यांशी आहे. न्यायालयाने या सीएला तीन दिवसांची कोठडी देत त्याला सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) सोपवले आहे.
मनी लाँडरिंगचा आरोपी सीए राजेशकुमार हा राजद नेते लालूप्रसाद यादव यांची मुलगी आणि खासदार मिसा भारती यांच्या कंपनीशीही संबंधित आहे.

ही कंपनीही कर चोरीच्या प्रकरणाच्या तपासाच्या कक्षेत आहे. अर्थात, ही अटक मिसा यांच्या प्रकरणात झालेली नाही. ‘ईडी’ने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील दोन व्यावसायिक बंधू वीरेंद्र जैन आणि सुरेंद्र जैन यांना मनी लाँडरिंगमध्ये मदत केल्याचा आरोप सीए अग्रवालवर आहे. आता त्याच्या सर्व व्यवहारांची चौकशी केली जाईल. अग्रवालने जैन ब्रदर्स आणि मेसर्स जगत प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या व्यवहारांत महत्त्वाची भूमिका बजावली होती. मे. मिशेल पॅकर्स अँड प्रिंटर्स प्रा. लि. च्या काही व्यवहारांतही तो सामील होता. मिशेल पॅकर्स अँड प्रिंटर्स मिसा भारतींचे आहे, अशी चर्चा आहे. एक हजार कोटी रुपयांच्या जमीन कराराबाबत मिसांशी संबंधित सुमारे आणखी १२ कंपन्या चौकशीच्या कक्षेत आहेत. काही दिवसांपूर्वी या कंपन्यांवर प्राप्तिकर विभागाने छापेही टाकले होते.
 
बातम्या आणखी आहेत...