आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅबमध्ये बलात्कार: आरोपी शिवकुमारला तीन दिवसांची कोठडी, युबर कॅब सर्व्हिस बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीत मोबाइल अॅपच्या मदतीने टॅक्सी बुक केलेल्या तरुणीवर युबर कंपनीच्या कॅबमध्ये बलात्कार करणारा आरोपी ड्रायव्हर शिवकुमार यादवला आज कोर्टात हजर करण्यात आले. पोलिसांनी अधिक तपासासाठी त्याची तीन दिवसांची कोठडी मागितली ती कोर्टाने मान्य केली आहे. दरम्यान, दिल्लीतील युबर कंपनीची सेवा बंद करण्यात आली. हे प्रकरण आज संसदेतही गाजले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सभागृहात त्यावर निवेदन केले.

तीन दिवसांची पोलिस कोठडी
आरोपी शिवकुमार यादवला सोमवारी दुपारी तीस हजारी कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्ट परिसरात मोठा बंदोबस्त होता. आरोपीला मारहाण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी आधीच सतर्कता बाळगली होती.
पोलिसांनी कोर्टात सांगितले, की आरोपीकडून घटनेवेळी वापरलेला मोबाइल स्मार्ट फोन, घटनेवेळी घातलेले कपडे आणि त्याचा डीएनए सँपल घ्यायचा आहे. त्यासाठी तीन दिवसांची कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
घटनेवेळी आरोपीकडे जो फोन होता तो, युबर कंपनीचा होता. त्यावरील अॅपच्या माध्यमातून पीडितेने कॅब बुक केली होती. घटनेच्या दिवशी त्याने जे कपडे घातलेले होते ते जप्त करणे बाकी आहे. इतरही पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी रिमांडची मागणी केली.
आधीही बलात्कारप्रकरणी भोगली शिक्षा
आरोपी शिवकुमारला 2011 मध्ये अशाच प्रकरणात शिक्षा झाली होती. शिवकुमार सात महिने तुरुंगावास भोगून आलेला आहे. त्यानंतरही अमेरिकन कंपनी युबरने कोणतीही शाहनिशा न करता त्याला ड्रायव्हर म्हणून ठेवले होते. शिवकुमारालाला सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

42 तास आणि 12 पथक
42 तासांचे अथक प्रयत्न आणि 12 टीमने केलेल्या तपास मोहिमेनंतर दिल्ली पोलिसांनी ड्रायव्हरला रविवारी रात्री मथुरा येथून अटक केली. या घटनेविरोधात आम आदमी पार्टीचे (आप) कार्यकर्ते आज रस्त्यावर आले. सोमवारी सकाळी आपच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या निवासस्थानासमोर धरणे दिले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
काय आहे घटना
गुडगाव येथील बुहराष्ट्रीय कंपनीत एक्झिक्युटिव्ह असलेल्या 27 वर्षीय तरुणीवर शुक्रवारी रात्री घरी परतत असताना टॅक्सी ड्रायव्हरने बलात्कार केला. या घटनेतील आरोपी ड्रायव्हरची माहिती देणार्‍याला पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
गुडगावच्या बहुराष्ट्रीय कंपनीत एक्झिक्युटिव्ह असलेली तरुणी घटनेच्या दिवशी मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये जेवण करून घरी जात होती. इंद्रलोकमधील आपल्या घरी जाण्यासाठी तिने मोबाइल अॅपच्या माध्यमातून यूबर या अमेरिकी कंपनीची टॅक्सी बुक केली होती. 15 मिनिटांनंतर रस्त्यातच धमकी देऊन ड्रायव्हर शिवकुमार यादवने (32) तिच्यावर अत्याचार केला. तो तो मथुरेचा रहिवासी आहे. दिल्ली पोलिसांनी ड्रायव्हरच्या मोबाइल लोकेशनवरून रविवारी मथुरेतून गुन्ह्यातील कार जप्त केली.
ड्रायव्हरची बनवेगिरी
ड्रायव्हरला अटक करण्यासाठी 12 पथकांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने छापे टाकले. दिल्ली पोलिसांनी टॅक्सी कंपनीला नोटीस बजावली आहे. बनावट नाव आणि पत्ता देऊन आरोपीने मोबाइल सिमकार्ड खरेदी केले होते. ही टॅक्सी शिवकुमारच्या नावावर होती. मात्र कंपनीने ड्रायव्हरचे व्हेरिफिकेशन केले नव्हते.

(फोटो - कॅबमध्ये बलात्कार करणारा आरोपी शिवकुमार पोलिसांच्या तावडीत)

पुढील स्लाइडमध्ये, निर्भया कांडानंतरच्या घोषणा