आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cab Meet On Wednesday At Delhi For Free Education

बुधवारी बैठक: नर्सरी ते दहावीपर्यंतचे शिक्षण मोफत, सक्तीचे?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मोफत आणि अनिवार्य शिक्षणाच्या हक्काची व्याप्ती वाढवून ती नर्सरी ते दहावीपर्यंत केली जाऊ शकते. आठवीपर्यंत नापास न करण्याच्या धोरणातही बदल केला जाऊ शकतो.

मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखाली १९ ऑगस्टला केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाच्या (कॅब) बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा होईल. या बैठकीत राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांव्यतिरिक्त शिक्षणतज्ज्ञ तसेच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ सहभागी होतील. सध्याच्या कायद्यानुसार, पहिली ते आठवीपर्यंतच मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद आहे. त्याची व्याप्ती वाढवून लहान मुलांना नर्सरीत प्रवेश आणि आठवी ते दहावीपर्यंत पोहोचण्यादरम्यान शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.