Home »National »Delhi» Cabinet Approve Ordinance On Increase 10 Percent Cess On Luxury Cars

लक्झरी SUV कारवरील सेस 15 ऐवजी 25%, केंद्रीय कॅबिनेटची मंजूरी; 3 लाखांनी कार महागणार

दिव्य मराठी वेब टीम | Aug 30, 2017, 15:09 PM IST

  • सध्या 15% सेस आहे. त्यात 10% वाढ करुन तो 25% करण्याला मंजूरी देण्यात आली.
नवी दिल्ली - लक्झरी SUV कारवर गुड्स अॅंड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) द्वारे लावण्यात आलेला सेस 10 टक्क्यांनी वाढून 25% करण्याच्या अध्यादेशाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. यासंबंधीचा प्रस्ताव 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जीएसटी कौन्सिल बैठकीत ठेवला जाणार आहे. यामुळे मध्यम, लार्ज आणि स्पोर्ट्स यूटिलिटी व्हिकल्स (एसयूव्ही) च्या किमती 1 ते 3 लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. कौन्सिलने 5 ऑगस्टला जीएसटी कॉम्पेन्सेशन कायद्यात बदल करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली होती. त्यात मोटर व्हिकल्सवरील सेस वाढवण्याचाही समावेश होता.
सेस वाढल्याने 52 ते 53% टॅक्स वाढणार
- सध्याच्या पद्धतीनुसार, 28 टक्के जीएसटीसह जास्तीत जास्त 15% सेस लावला जातो. यामुळे लक्झरी कारवर जवळपास 43% टॅक्स लागत होता.
- आता नव्या अध्यादेशानंतर सेस वाढल्याने मोठ्या वाहनांवर 52 ते 53 टक्के टॅक्स लागणार आहे.
राज्यांची नुकसान भरपाई मुख्य कारण
- केंद्र सरकारने आणखी एक जीएसटी विधेयक (राज्यांच्या महसूलाची नुकसान भरपाई) 2016 मध्ये सादर केले होते. याचा उद्देश निवडक लक्झरी गुड्सवर सेस लावून जीएसटीमुळे राज्यांच्या महसूलात झालेली तूट भरून काढणे हा होता.
- राज्यांची महसूलातील तूट भरुन काढण्याच्या या प्रस्तावाला संविधानात दुरुस्ती करुन सामिल करण्यात आले आहे. यामुळे केंद्र सरकारला आता पुढील 5 वर्षे राज्यांना नुकसान भरपाई देणे क्रमप्राप्त झाले आहे.
जीएसटी नंतर कार कंपन्यांनी केली होती दर कपात
- जीएसटी लागू झाल्यानंतर ऑटोमोबाइल कंपन्यांनी मोठ्या आणि एसयूव्ही कारच्या किंमतीत 1 ते 3 लाखांची कपात केली होती.
- यानंतर डिलर्सकडून सांगण्यात आले होते की ग्राहकांकडून चौकशी वाढली आहे. दुसरीकडे, कार कंपन्यांनी या आर्थिक वर्षात डबल डिजिट सेल्सचा अंदाज वर्तवला होता.
ऑटो स्टॉक्सवर परिणाम नाही
- कॅबिनेटने लक्झरी कारवर सेस वाढवण्याच्या निर्णयाचा परिणाम ऑटो कंपन्यांच्या स्टॉक्सवर दिसलेला नाही.
- लक्झरी आणि एसयूव्ही कार निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्राचे स्टॉक्स सोडल्यास टाटा मोटर्स आणि मारुती सुजूकीच्या स्टॉक्समध्ये वृद्धी पाहायला मिळाली.

Next Article

Recommended