आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Union Cabinet Approved SeparateTelangana State Bill

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्रीय मंत्रिमंडळाची तेलंगणा विधेयकाला मंजुरी;12 फेब्रुवारीला संसदेत विधेयक मांडणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी वादग्रस्त स्वतंत्र तेलंगणा राज्यनिर्मितीच्या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली. संसदेत येत्या 12 फेब्रुवारीला तेलंगणा विधेयक मांडले जाणार आहे.तेलंगणाचे मूळ विधेयक 32 दुरुस्त्यांसह संसदेत मांडले जाईल. दरम्यान, विधेयक संसदेत सादर करण्यावर बंदी घालण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. आंध्र प्रदेश फेररचना विधेयकाच्या मसुद्यात हैदराबादला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची तरतूद नाही. मात्र हैदराबाद 10 वर्षांपर्यंत तेलंगणा व सीमांध्रची संयुक्त राजधानी राहील. सरकार रायलसीमा व आंध्रच्या उत्तर किनारपट्टी भागांसाठी विशेष पॅकेजही देणार आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी तूर्तास राज्यपालांकडे सोपवली जाईल. तेलंगणाचा मसुदा विधेकाला कॅबिनेटमध्ये सादर करण्यापूर्वी विशेष मंत्रिगट व सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली कोअर ग्रुपची बैठक झाली.
संसदेत पुन्हा गदारोळ
लोकसभेच्या अधिवेशनात तेलंगणा विधेयक मांडून ते मंजूर करवून घेण्याचा सरकारचा मनसुबा आहे. मात्र या मुद्द्यावरून गेल्या तीन दिवसांपासून संसदेत मोठा गदारोळ होत आहे. मनमोहनसिंग सरकारविरुद्ध तीन लोकसभा सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिलेली आहे.